क्लार्क, स्मिथची शतके

By Admin | Updated: December 11, 2014 01:26 IST2014-12-11T01:26:58+5:302014-12-11T01:26:58+5:30

स्टीव्ह स्मिथच्या नाबाद 162 धावांच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत दुस:या दिवशी पावसाच्या व्यत्ययात 7 बाद 517 र्पयत मजल गाठली.

Clarke, centuries of Smith | क्लार्क, स्मिथची शतके

क्लार्क, स्मिथची शतके

>पहिली कसोटी : ऑस्ट्रेलिया 7 बाद 517 धावा, भारतीय गोलंदाज ‘फ्लॉप’
अॅडिलेड : कमरेच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेला कर्णधार मायकेल क्लार्क याने दु:ख दूर सारून ठोकलेल्या 128 धावा तसेच स्टीव्ह स्मिथच्या नाबाद 162 धावांच्या बळावर यजमान ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत दुस:या दिवशी पावसाच्या व्यत्ययात 7 बाद 517 र्पयत मजल गाठली.
अंधुक प्रकाश आणि पावसामुळे खेळात तीनदा व्यत्यय आला. केवळ 3क् षटकांचा खेळ शक्य झाला. काल कंबरेचे दुखणो उमळल्याने मैदानाबाहेर गेलेल्या क्लार्कने 28वे शतक गाठताच उपस्थित 15 हजार प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे अभिनंदन केले. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. त्यांच्या वाटय़ाला केवळ क्लार्कची विकेट आली. क्लार्क स्क्वेअर लेगवर ङोलबाद झाला. एकीकडे गोलंदाज 
लाईन आणि लेंथसाठी झगडत असताना क्लार्कचे स्ट्रोक्स पाहण्यासारखे होते. स्मिथने पाचव्या शतकासह कारकिर्दीत सवरेत्कृष्ट 162 धावा झळकावल्या.
क्लार्कने शतक पूर्ण करताच आकाशाकडे पाहून दिवंगत फिलिप ह्युज याला श्रद्धांजली वाहिली. काल अखेरच्या सत्रत तीन गडी बाद करून आनंदी झालेल्या भारताला आज मात्र निराशा पत्करावी लागली. प्रभारी कर्णधार विराट कोहलीच्या चेह:यावर हे स्पष्टपणो जाणवत होते. क्लार्क- स्मिथ यांनी सातव्या गडय़ासाठी 
163 धावांची भागीदारी केली. 
खेळ थांबला त्या वेळी स्मिथसोबत मिशेल जॉन्सन शून्यावर नाबाद 
होता.(वृत्तसंस्था)
 
‘क्लार्कने अविश्वसनीय साहस दाखविले’ : फिलिप ह्युजच्या निधनाचे दु:ख याशिवाय कमरेच्या दुखापतीचा त्रस सहन करूनदेखील कर्णधार मायकल क्लार्कने अविश्वसनीय साहसी प्रदर्शन करताना भारताविरुद्ध दुस:या कसोटीमध्ये उल्लेखनीय फलंदाजी केल्याचे मत ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले आह़े स्मिथ म्हणाला,  तो चांगला डाव खेळू इच्छित होता़ काही फटके खेळताना त्याला त्रस होत होता़ 
 
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : ािस रॉजर्स ङो. धवन गो. ईशांत 9, डेव्हिड वॉर्नर ङो. ईशांत गो. कर्ण शर्मा 145, शेन वॉटसन ङो. धवन गो. अॅरोन 14, क्लार्क ङो. पुजारा गो. कर्ण 128, स्मिथ नाबाद 162, मिशेल मार्श ङो. कोहली गो. अॅरोन 41, नाथन लियॉन त्रि. गो. शमी 3, ब्रॅड हॅडीन ङो. साहा गो. शमी क्क्, जॉन्सन नाबाद क्क्, अवांतर : 15, एकूण : 12क् षटकांत 7 बाद 517 धावा. गडी बाद क्रम : 1/5क्, 2/88, 3/2क्6, 4/345, 5/352, 6/354, 7/517. गोलंदाजी : शमी 24-2-12क्-2, अॅरोन 23-1-136-2, ईशांत 27-5-85-1, कर्ण 33-1-143-2, विजय 13-3-29-क्.
 
पावसामुळे चार तासांचा खेळ व्यर्थ
सकाळी पहिल्या तासात खेळ होऊ शकला. त्यानंतर तीन वेळा पावसाने हजेरी लावल्याने चार तासांचा वेळ वाया गेला. उपाहारानंतर अर्धा तास खेळ झाला. याची भरपाई म्हणून पंचांनी चहापान न करण्याचा निर्णय घेतला; पण केवळ 4क् मि. खेळ होत नाही तोच पुन्हा पावसाचे आगमन झाले. दिवसभरात केवळ 3क्.4 षटकांचाच खेळ झाला.
 
क्लार्कच्या भारताविरुद्ध 
दोन हजार धावा
कर्णधार मायकेल क्लार्कने भारताविरुद्ध दोन हजार कसोटी धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा आणि जगातील पाचवा खेळाडू ठरला. त्याने 28 शतकांपैकी 17 शतके मायेदेशात ठोकली आहेत.

Web Title: Clarke, centuries of Smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.