भारताविरुद्ध एकमेव टी-२० साठी ख्रिस गेल विंडीज संघात

By Admin | Updated: July 6, 2017 01:36 IST2017-07-06T01:36:31+5:302017-07-06T01:36:31+5:30

भारताविरुद्ध रविवारी खेळल्या जाणाऱ्या एकमेव टी-२० सामन्यासाठी आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला वेस्ट इंडीज संघात स्थान

In the Chris Gayle West Indies squad for the only T20 against India | भारताविरुद्ध एकमेव टी-२० साठी ख्रिस गेल विंडीज संघात

भारताविरुद्ध एकमेव टी-२० साठी ख्रिस गेल विंडीज संघात

किंग्स्टन : भारताविरुद्ध रविवारी खेळल्या जाणाऱ्या एकमेव टी-२० सामन्यासाठी आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला वेस्ट इंडीज संघात स्थान देण्यात आले आहे. या प्रकारात ३५.३२ च्या सरासरीने १,५१९ धावा काढणाऱ्या गेलला लेंडल सिमन्सच्या जागी स्थान मिळाले. सबीना पार्क या घरच्या मैदानावर गेलचा हा पहिलाच टी-२० सामना असेल. या प्रकारात दोन शतके ठोकणारा गेल संघासाठी मागचा टी-२० सामना २०१६ च्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता.

Web Title: In the Chris Gayle West Indies squad for the only T20 against India