सन्मान राखणारा उमेदवार निवडून द्या
By Admin | Updated: January 29, 2015 03:11 IST2015-01-29T03:11:44+5:302015-01-29T03:11:44+5:30
एन. श्रीनिवासन यांचा विरोधी चेहरा बनलेले आदित्य वर्मा यांनी बीसीसीआयच्या सदस्यांना आवाहन केले आहे

सन्मान राखणारा उमेदवार निवडून द्या
नवी दिल्ली : एन. श्रीनिवासन यांचा विरोधी चेहरा बनलेले आदित्य वर्मा यांनी बीसीसीआयच्या सदस्यांना आवाहन केले आहे, की त्यांनी सहा महिन्यांच्या आत होणा-या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडणुकीत संघटनेचा मान राखणारा उमेदवार निवडून द्यावा. आता अध्यक्षपदी प्रामाणिक उमेदवाराची गरज आहे. याचा इतर सदस्यांनी गांभीर्याने विचार करावा. वर्मा यांनी आपले वकील चंद्रशेखर वर्मा यांच्या माध्यमातून बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव यांना आवाहन केले आहे. एवढेच नव्हे, तर जो व्यक्ती अध्यक्ष बनेल त्यांचा वैयक्तिक स्वार्थही नसावा. तसेच श्रीनिवासन यांच्या काळात झालेली सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग तसेच गैरव्यवहार होऊ नये, याची दक्षताही नव्या अध्यक्षाला घ्यावी लागेल, असेही वर्मा यांनी म्हटले आहे.
(वृत्तसंस्था)