शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

पाकसमोर ‘चोकर्स’चे तगडे आव्हान

By admin | Updated: March 7, 2015 01:50 IST

विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात सलामीच्या दोन सामन्यांत भारत व वेस्ट इंडीज विरुध्द पराभव पत्करलेल्या पाकिस्तानने झिम्बाब्वे आणि यूएईला नमवत आपली गाडी विजयी ट्रॅकवर आणली.

आॅकलंड : विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात सलामीच्या दोन सामन्यांत भारत व वेस्ट इंडीज विरुध्द पराभव पत्करलेल्या पाकिस्तानने झिम्बाब्वे आणि यूएईला नमवत आपली गाडी विजयी ट्रॅकवर आणली. मात्र आता शनिवारी आॅकलंडला त्यांची गाठ पडणार ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी.यंदाच्या स्पर्धेत फलंदाजीच्या समस्येशी झुंजणाऱ्या पाकिस्तानचा निभाव तुफान द. आफ्रिके विरुध्द कसा लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याचवेळी आफ्रिकेचे डेल स्टेन, मॉर्नी मॉर्कल यांसारखे भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजांसमोर पाक फलंदाजीची खरी कसोटी लागेल. प्रत्येक सामन्यात पाकिस्तानची आघाडीची फळीने कच खाल्ली आहे. त्यानंतर कर्णधार मिसबाह उल हक आणि गोलंदाजांनी संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे आफ्रिकेसारख्या तगड्या संघासमोर पाकची आघाडीची फळी फॉर्ममध्ये येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आफ्रिकेविरुध्द विजय मिळवण्यासाठी कोणा एकावर अवलंबून न राहता सांघिक कामगिरीची पाकला गरज आहे.गोलंदाजीचा विचार केल्यास पाकिस्तानची बाजू त्यातला त्यात समाधानकारक आहे. डावखुरे अव्वल मध्यमगती गोलंदाज जबरदस्त आक्रमतेने मारा करीत असले तरी त्यांचे पहिले लक्ष्य हे तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धडाकेबाज एबी डीव्हीलियर्सला रोखण्याचेच असेल.दुसऱ्या बाजूला भारताविरुध्द झालेल्या निराशाजनक पराभवाने खडबडून जागे झालेल्या दक्षिण आफ्रिकेने सलग दोन सामन्यांत ४०० धावांचा डोंगर उभारुन इतर संघांना धोक्याच्या इशारा दिला आहे. शिवाय हाशीम आमला, एबी डिव्हीलियर्स, फाफ डू प्लेसीस यांसारखे हुकमी फलंदाज देखील पुर्ण फॉर्ममध्ये असल्याने पाक समोरील अडचणी वाढल्या आहेत. पाकला नमवून बाद फेरी गाठण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्याचे लक्ष्य आफ्रिकेने बाळगले आहे. त्याचवेळी धावांचा पाठलाग करताना त्यांना पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. माझ्यामते संघाची चांगल्या प्रकारे कामगिरी होत आहे. स्पर्धेच्या निराशाजनक सुरुवातीनंतर आम्ही सावरलो आणि यानंतर स्पर्धेत आमची कामगिरी शानदार झाली आहे. - डेल स्टेन, वेगवान गोलंदाज, दक्षिण आफ्रिकासर्वांचे लक्ष आमच्या कामगिरीवर लागले आहे. स्पर्धेत आगेकुच करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना असल्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही पुर्ण पणे सज्ज असून या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु.- मिसबाह-उल-हक, कर्णधार पाकिस्तानपाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहजाद, एहसान अदील, हॅरिस सोहेल, मोहम्मद हाफिज, मोहम्मद इरफान, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शाहिद आफ्रिदी, शोएब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल (यष्टीरक्षक), बाहब रिआज, यासीर शाह, युनिस खान.दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला (उपकर्णधार), कायले अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जीन पॉल डुमीनी, फा डू प्लेसिस, इमरान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वॅन पार्नेल, अ‍ॅरोन फंगिसो, वेर्नोन फिलेंडर, रिली रोसोवू, डेल स्टेन.