चिलीकडून गत चॅम्पियन स्पेन ‘आऊट’

By Admin | Updated: June 20, 2014 01:33 IST2014-06-20T01:32:15+5:302014-06-20T01:33:16+5:30

गत चॅम्पियन स्पेनला बुधवारी रात्री चिलीकडून क्-2ने अपमानास्पद पराभव पत्करावा लागताच फिफा विश्वचषकातील या संघाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

Chilean champions Spain 'out' | चिलीकडून गत चॅम्पियन स्पेन ‘आऊट’

चिलीकडून गत चॅम्पियन स्पेन ‘आऊट’

>रियो दि जेनेरियो : गत चॅम्पियन स्पेनला बुधवारी रात्री चिलीकडून क्-2ने अपमानास्पद पराभव पत्करावा लागताच फिफा विश्वचषकातील या संघाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या फेरीत बाहेर पडणारा स्पेन चौथा गतविजेता संघ ठरला.
स्पर्धेत कायम राहण्यासाठी स्पेनला किमान एक विजय किंवा सामना अनिर्णित सोडविण्याची गरज होती. ब्राझील 1966, फ्रान्स 2क्क्2 व इटलीनंतर गतविजेत्यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागण्याची नामुष्की स्पेनवर आली. काल स्पेनसोबत ऑस्ट्रेलियादेखील बाहेर पडला. हॉलंडकडून ऑस्ट्रेलियाचा 3-2ने पराभव झाला. त्याआधी हॉलंडनेच स्पेनला 5-1ने जबर धक्का दिला होता. यामुळे चिलीविरुद्धची स्पेनची लढत ‘करा वा मरा’ अशी होती. पहिल्या फेरीत केवळ 2 सामने खेळून बाहेर पडणारा स्पेन विश्वचषकात पहिलाच संघ बनला. यापूर्वी असे उदाहरण घडले नव्हते. एडुआडरे वार्गस याने 2क्व्या मिनिटाला चिलीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 43व्या मिनिटाला चाल्र्स अरांगुईजने आघाडी दुप्पट करीत 2क्1क्च्या विश्वचषकात स्पेनकडून झालेल्या 1-2 या पराभवाचा वचपा काढला.
मागच्या विश्वचषकात स्पेनने पहिला सामना गमविल्यानंतरही जगज्जेतेपदावर ङोप घेतली. यंदा हॉलंडकडून सलामीला पराभव झाल्यानंतर त्यांच्या समस्या वाढल्या. 195क्मध्ये ब्राझीलकडून स्पेनचा 6-1ने पराभव झाला होता. काल पूर्वार्धातील 45 मिनिटांत चिलीच्या आक्रमक खेळाला स्पेनने काहीच उत्तर दिले नाही. या विश्वचषकात स्पेनने केवळ एक गोल नोंदविला. या विजयानंतर ब गटातून चिली आणि हॉलंड उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. स्पेनला 23 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळायचा आहे, पण ही लढत दोन्ही संघांसाठी केवळ औपचारिकता असेल. चिलीविरुद्ध स्पेनला आघाडी मिळविण्याची संधी आली होती, पण जावी अलोन्सो याचा शॉट प्रतिस्पर्धी गोलकिपर क्लॉडियो ब्राव्होने थोपवून लावला. पाच मिनिटांनंतर वार्गसने स्पेनचा गोलकिपर इकेर कॅसिलॉसला चकवत गोल नोंदविला. चाल्र्सने 43व्या मिनिटाला रिबाऊंडवर दुसरा गोल केला. सांचेजला मिळालेली फ्री किक स्पेनचा गोलकिपर कॅसिलॉसने बाहेर करताच चेंडू चाल्र्सकडे आला. त्यावर चाल्र्सने चेंडू थेट गोलजाळीत ढकलला. उत्तरार्धात स्पेनला संधी मिळाली. 53व्या मिनिटाला सर्गियो बुस्कुटवेट्स याने ही संधी गमावली. 8क्व्या मिनिटाला बदली खेळाडू काजोर्ला याने आणखी एक प्रयत्न केला, पण चिलीच्या गोलकिपरने हा शॉट अलगद रोखला. नंतर 84व्या मिनिटाला आंद्रेस इनिएस्टाचा शॉटदेखील असाच रोखण्यात आला. (वृत्तसंस्था)
 
संघाच्या कामगिरीमुळे काही खेळाडूंवर कु:हाड कोसळणार हे निश्चित आहे. मोठय़ा स्पर्धेतील अपयशानंतर 
हे होणो स्वाभाविक आहे. यावेळी 
मी कोणतेही विश्लेषण करणार नाही, कारण त्यासाठी आमच्याकडे खूप वेळ आहे. आम्हाला संयमाने विचार करण्याची गरज आहे.
-विन्सेंट डेल बोस्क, 
स्पेनचे प्रशिक्षक
 
पराभवाची मानहानी
चिलीकडून पराभूत झालेल्या स्पेन टीमचा मिडफिल्डर जावी अलोंसोने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणो म्हणजे मानहानी असून स्पेनच्या एका युगाचा शेवट असल्याचे म्हटले आह़े आम्ही आमची विजयाची भूक आणि जिद्द यामध्ये सातत्य ठेवू शकलो नाही. हा पराभव लज्जस्पद आहे. 

Web Title: Chilean champions Spain 'out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.