चिलीचा स्पेनवर २-० ने विजय, गतविजेता स्पेन स्पर्धेबाहेर

By Admin | Updated: June 19, 2014 08:52 IST2014-06-19T06:21:53+5:302014-06-19T08:52:45+5:30

चिलीने स्पेनचा २-० असा पराभव करत स्पेनला स्पर्धेबाहेर घालवले आहे.

Chile beat Spain 2-0, defending champion Spain out of the tournament | चिलीचा स्पेनवर २-० ने विजय, गतविजेता स्पेन स्पर्धेबाहेर

चिलीचा स्पेनवर २-० ने विजय, गतविजेता स्पेन स्पर्धेबाहेर

ऑनलाइन टीम

रिओ दे जेनेरिओ, दि. १९ - चिलीने स्पेनचा २-० असा पराभव करत स्पेनला स्पर्धेबाहेर घालवले आहे.  पहिल्यापासूनच आक्रमक खेल करणा-या चिलीच्या वर्गासने १९ व्या मिनिटाला गोल करून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. अनेक प्रयत्न करूनही स्पेनच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. नेहमी आक्रमक पवित्र्यात असणा-या स्पेनच्या संघाने चिली पुढेशरणागती पत्करल्याचे त्यांच्या खेळातून दिसून येत होते. ४३ व्या मिनिटाला अरंगेने ने गोल करत स्पेनच्या प्रेक्षकांना हादरा दिला आणि आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मध्यंतरापूर्वी  २-० अशी आघाडी घेतलेल्या चिलीने मध्यंतरानंतरही चांगला खेळ करत स्पेनला एकही गोल न करू दिल्याने गतविजेत्या स्पेनवर पराभवासोबतच स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली.

Web Title: Chile beat Spain 2-0, defending champion Spain out of the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.