पिछाडीवरून चेल्सीची मुसंडी
By Admin | Updated: August 20, 2014 00:32 IST2014-08-20T00:32:36+5:302014-08-20T00:32:36+5:30
चेल्सीने 3-1ने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या लढतीत बर्नलीवर दणदणीत विजय नोंदवला. क्-1ने पिछाडीवर असणा:या चेल्सीने सनसनाटी पुनरागमन करत बर्नलीवर विजय मिळवला.

पिछाडीवरून चेल्सीची मुसंडी
केदार लेले - लंडन
चेल्सीने 3-1ने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या लढतीत बर्नलीवर दणदणीत विजय नोंदवला. क्-1ने पिछाडीवर असणा:या चेल्सीने सनसनाटी पुनरागमन करत बर्नलीवर विजय मिळवला.
14व्या मिनिटाला बर्नलीने आघाडी घेतल्यामुळे स्टेडियममधील माहोल बदलला. चेल्सीच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी शर्थीचे प्रयत्न केले. बर्नलीची आघाडी केवळ 4 मिनिटे टिकली. 18व्या मिनिटाला चेल्सीकडून इवानोविचने मारलेला फटका गोलपोस्टला लागून परतताना दिएगो कोस्टाने या संधीचे रूपांतर गोलमध्ये केले आणि चेल्सीला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली.
उत्तम पासिंगचा नमुना पेश करत चेल्सीने दुसरा गोल केला. 21व्या मिनिटाला हॅजर्डने ड्रिबल करीत इवानोविचला पास दिला. इवानोविचला फॅब्रिगासला आणि फॅब्रिगासने शर्लेला उत्कृष्ट पास दिला. जर्मनीचा स्टार खेळाडू अँड्रय़ू शर्लेने आपल्या गोलद्वारे चेल्सीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
34व्या मिनिटाला चेल्सीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा फायदा घेत इवानोविचने गोल केला आणि चेल्सीला 3-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
चेल्सीच्या अप्रतिम आणि जिद्दी खेळाने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. 14व्या मिनिटाला क्-1 असे पिछाडीवर असलेल्या चेल्सीने नंतर केवळ 2क् मिनिटांत तीन गोल केले, हे विशेष! या तिन्ही गोलनी त्यांनी बर्नलीच्या बचावफळीची लक्तरे वेशीवर टांगली आणि सामना जिंकला.