चेल्सी अजूनही अव्वल; मँचेस्टर सिटी चेल्सीच्या मागावर!
By Admin | Updated: December 3, 2014 02:07 IST2014-12-03T02:07:45+5:302014-12-03T02:07:45+5:30
शनिवारी संडरलँडने बलाढ्य आणि गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या चेल्सीला गोलशून्य बरोबरीत रोखण्याचा अग्निदिव्य पराक्रम केला

चेल्सी अजूनही अव्वल; मँचेस्टर सिटी चेल्सीच्या मागावर!
केदार लेले, लंडन
शनिवारी संडरलँडने बलाढ्य आणि गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या चेल्सीला गोलशून्य बरोबरीत रोखण्याचा अग्निदिव्य पराक्रम केला; तसेच रविवारी साउथअँम्टन विरुद्ध अटी-तटीची लढत मँचेस्टर सिटीने एकतर्फी करत जिंकली. या विजयामुळे मँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांच्यात केवळ सहा गुणांचा फरक राहिला आहे! चेल्सीवर दडपण आणण्यासाठी तसेच त्यांची (गुणांची) आघाडी कमी करण्यासाठी मँचेस्टर सिटीला प्रत्येक विजय महत्वाचा आहे!
गुणतक्त्यात फेरबदल होण्याच्या दृष्टीकोणातून पाहिलेतर बुधवारी (३ डिसेंबर रोजी) चार महत्वपूर्ण लढती होणार आहेत! फुटबॉल पंडितांच्या मते चेल्सी विरुद्ध टोटनम, आर्सनल विरुद्ध साउथअँम्टन, एव्हर्टन विरुद्ध हल सिटी आणि संडरलँड विरुद्ध मँचेस्टर सिटी यांच्यातील या लढती रंगतदार होतील हे निश्चित! चलातर या बुधवारी होणाऱ्या या महत्वपूर्ण लढतींवर टाकूयात एक धावती नजर ...