चेन्नई सुपरकिंग्जला मुंबई इंडियन्सचे १८८ धावांचे आव्हान
By Admin | Updated: May 19, 2015 21:40 IST2015-05-19T21:40:06+5:302015-05-19T21:40:06+5:30
सलामी वीर लेंडल सिमन्स व पार्थिव पटेल या जोडगोळीने सलामीला साजेशी खेळी केली. सिमन्सने ५१ चेंडूत तब्बल पाच षटकार व तीन चौकार लगावत ६५ धावा करून

चेन्नई सुपरकिंग्जला मुंबई इंडियन्सचे १८८ धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - नाणेफेक जिंकत मुंबई इंडयन्सने फलंदाजीचा निर्णय घेतला.
सलामी वीर लेंडल सिमन्स व पार्थिव पटेल या जोडगोळीने सलामीला साजेशी खेळी केली. सिमन्सने ५१ चेंडूत तब्बल पाच षटकार व तीन चौकार लगावत ६५ धावा करून चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. जडेजाच्या चेंडूवर फटकेबाजी करताना नेगीकडे झेल गेल्याने सिमन्स बाद झाला. तर पार्थिव पटेल ब्राव्होच्या चेंडूवर षटक मारण्याच्या प्रयत्नात असताना जडेजाकडे झेल गेल्याने बाद झाला. कायरन पोलार्ड वगळता मधल्या खेळाडूंना फारशी चांगली फलंदाजी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा १९ धावांवर तर, हार्दिक पांड्या एक धाव करत तंबूत परतला. १० धावांवर बाद झाल्याने अंबती रायडूकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा मावळल्या. शेवटच्या षटकात षटकार मारण्याच्या प्रयत्नात असताना पोलार्ड ४१ धावांवर बाद झाला.