केकेआरला रोखण्याचे सनरायजर्सपुढे आव्हान

By Admin | Updated: April 30, 2017 02:11 IST2017-04-30T02:11:08+5:302017-04-30T02:11:08+5:30

आत्मविश्वास उंचावलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला रविवारी गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या लढतीच्या निमित्ताने

Challenges the Sunrisers to stop KKR | केकेआरला रोखण्याचे सनरायजर्सपुढे आव्हान

केकेआरला रोखण्याचे सनरायजर्सपुढे आव्हान

हैदराबाद : आत्मविश्वास उंचावलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला रविवारी गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळेल. साखळी फेरीत ९ सामन्यांत १४ गुणांची कमाई करणारा केकेआर संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी, तर सनरायजर्स ९ सामन्यांत ११ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
सध्याच्या आयपीएलमध्ये अनेक विक्रम केकेआर संघातील खेळाडूंच्या नावावर आहेत. केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरकडे सध्या आॅरेंज कॅप, तर फिरकीपटू व आता सलामीवीर असलेला सुनील नारायण ‘सर्वांत अनमोल खेळाडू’च्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे. रॉबिन उथप्पाने सर्वांधिक षटकार ठोकले आहेत. सनरायजर्स संघ १५ एप्रिल रोजी कोलकात्यामध्ये यापूर्वीच्या लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास प्रयत्नशील आहे.

Web Title: Challenges the Sunrisers to stop KKR