कॅरम : महम्मद घुफ्रान व शिल्पा पळणीटकरला प्रथम मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 17:51 IST2018-12-13T17:50:09+5:302018-12-13T17:51:50+5:30
मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन १५ व १६ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले आहे.

कॅरम : महम्मद घुफ्रान व शिल्पा पळणीटकरला प्रथम मानांकन
मुंबई : शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन १५ व १६ डिसेंबर २०१८ रोजी शिवडी मुंबई महानारपालिका शाळा, शिवडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरी विभागात इंडियन ऑईलच्या महम्मद घुफ्रानला तर महिला एकेरी विभागात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शिल्पा पळणीटकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
स्पर्धेतील मानांकने पुढीलप्रमाणे
पुरुष गट : १) महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ) २) योगेश धोंगडे ( जैन इरिगेशन ) ३) पंकज पवार ( जैन इरिगेशन ) ४) प्रशांत पवार ( रिझर्व्ह बँक ) ५) फईम काझी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) ६) अभिषेक भारती ( एस. एस. ग्रुप ) ७) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) ८) संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. )
महिला गट : १) शिल्पा पळणिटकर ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) २) निलम घोडके ( जैन इरिगेशन ) ३) उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) ४) प्रीती खेडेकर ( पी. सी. डी. ए. नेव्ही ) ५) संगीता चांदोरकर ( रिझर्व्ह बँक ) ६) आयेशा महम्मद ( जैन इरिगेशन ) ७) अनुपमा केदार ( बँक ऑफ इंडिया ) ८) जान्हवी मोरे ( बँक ऑफ इंडिया )