कॅमेरुनने कॉन्फेडरेशन कपमध्ये केला प्रवेश

By Admin | Updated: February 7, 2017 02:24 IST2017-02-07T02:24:48+5:302017-02-07T02:24:48+5:30

रशियाच्या यजमानपदाखाली यंदाच्या वर्षी होत असलेल्या कॉन्फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य कॅमेरुन संघाने अखेर आपला प्रवेश निश्चित केला

Cameron has admitted to the Confederations Cup | कॅमेरुनने कॉन्फेडरेशन कपमध्ये केला प्रवेश

कॅमेरुनने कॉन्फेडरेशन कपमध्ये केला प्रवेश

मॉस्को : रशियाच्या यजमानपदाखाली यंदाच्या वर्षी होत असलेल्या कॉन्फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य कॅमेरुन संघाने अखेर आपला प्रवेश निश्चित केला. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत कॅमेरुनने आठवा प्रतिस्पर्धी म्हणून स्पर्धेत प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे, आफ्रिका कप आॅफ नेशन्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर कॅमेरुनला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे.
रविवारी झालेल्या आफ्रिका कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅमेरुनने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना इजिप्तचा २-१ असा पाडाव करून दिमाखात विजेतेपद पटकावले. तसेच, यासह कॅमेरुनने कॉन्फेडरेशन कप स्पर्धेतही आपली जागा निश्चित केली.
(वृत्तसंस्था)

Web Title: Cameron has admitted to the Confederations Cup