सी. के. नायडू क्रिकेट : हैदराबादविरूद्ध महाराष्ट्राला ३ गुण
By Admin | Updated: October 27, 2016 20:58 IST2016-10-27T20:58:35+5:302016-10-27T20:58:35+5:30
सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत हैदराबादविरूद्ध संपलेल्या अनिर्णित सामन्यात यजमान महाराष्ट्राने सांघिक कामगिरीच्या आधारावर ३ गुणांची कमाई केली.

सी. के. नायडू क्रिकेट : हैदराबादविरूद्ध महाराष्ट्राला ३ गुण
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ : सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत हैदराबादविरूद्ध संपलेल्या अनिर्णित सामन्यात यजमान महाराष्ट्राने सांघिक कामगिरीच्या आधारावर ३ गुणांची कमाई केली.
गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर ही ४ दिवसीय लढत झाली. हैदराबादच्या पहिल्या डावातील ३०४ धावांच्या उत्तरात महाराष्ट्राने ४१२ धावा करीत १०८ धावांची मौल्यवान आघाडी घेतली होती. हीच आघाडी ३ गुण मिळण्यास निणार्यक ठरली. दुसऱ्या डावात हैदराबादने २५३ धावा केल्या. उर्वरित दिवसाच्या खेळामध्ये महाराष्ट्राने ३ बाद ४० धावा केल्या. पाहुण्या हैदराबादला एका गुणावर समाधान मानावे लागले. राधाकृष्णा मारापतीचे अवघ एका धावेने हुकलेले शतक व महाराष्ट्राच्या जगदीश झोपेने घेतलेले ५ बळी हे हैदराबादच्या दुसऱ्या डावातील वैशिष्ट्य ठरले. राधाकृष्णला उत्कर्ष अग्रवालने बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
हैदराबाद : पहिला डाव : ३०४.
महाराष्ट्र : पहिला डाव : ४१२.
हैदराबाद : दुसरा डाव : १०१.५ षटकांत सर्व बाद २५३ (राधाकृष्ण मारीपती ९९, तनथ थायगाराजन ५०, जगदीश झोपे ५/२५, प्रदीप दाढे २/४८, उत्कर्ष अग्रवाल १/१९, यासर शेख १/२८, शुभम कोठारी १/३९).
महाराष्ट्र : दुसरा डाव : ७.५ षटकांत ३ बाद ४० (निखिल नाईक नाबाद १९, जय पांडे १३, विजय झोल ६, शमसुझमा काझी ०, राधाकृष्ण मारीपती २/१६, रवी तेजा १/२३).