बांगरची कसोटी
By Admin | Updated: August 22, 2014 01:09 IST2014-08-22T01:09:37+5:302014-08-22T01:09:37+5:30
संजय बांगरसमोर भारतीय संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे.

बांगरची कसोटी
वन-डे मालिका : भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आव्हान
शिवाजी गोरे - पुणो
सातव्या आयपीएलमध्ये ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ला आपल्या नियोजनपूर्वक रणनीतीने अंतिम फेरीर्पयत पोहोचविणा:या संजय बांगरसमोर भारतीय संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे. क्रिकेटमधला त्याचा अनुभव, तंत्रशुद्ध खेळ, रणनीती आखण्यात असलेला हातखंडा, डोके शांत ठेवून खेळाडूंशी संवाद साधण्याचे त्याचे कौशल्य या सर्वाचा विचार करूनच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी टाकली आहे.
भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. संपूर्ण भारतवर्षातून संघाच्या कामगिरीवर स्तुतिसुमने उधळण्यात आली. मात्र, या विजयानंतर पुढील सामन्यांत भारताला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव जिव्हारी लागल्याने बीसीसीआयने विदेशी मार्गदर्शकांच्या ऐवजी भारतीय मार्गदर्शकांची तडकाफडकी नेमणूक केली आहे. ही जबाबदारी रवी शास्त्रीच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगर, भारत अरुण आणि आर. श्रीधर यांच्याकडे देण्यात आली आहे.
बीसीसीआयची ही खेळी जर यशस्वी ठरली, तर भविष्यात भारतीय क्रिकेटला परदेशी मार्गदर्शकांची गरज भासणार नाही. यात बांगरची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. भारतीय संघाच्या कसोटीतील पराभवाची कारणो शोधून खेळाडूंना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याला अगिAपरीक्षेतून जावे लागेल. हे आव्हान पेलण्यासाठी बांगर गुरुवारी लंडनमध्ये दाखल झाला आहे.
संजय बांगर याला 12 कसोटी आणि 15 वन डे खेळण्याचा अनुभव असून, प्रतिभवान कोच म्हणून त्याची गणना होते. त्याने यंदा किंग्ज पंजाबला आयपीएलची अंतिम फेरी गाठून दिली होती. बांगरला गेल्या अनेक वर्षापासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. रेल्वे संघालासुद्धा तो मार्गदर्शन करतो. विरुद्ध संघाला नामोहरम करण्यासाठी त्यांच्यातील उणिवा चांगल्या पद्धतीने हेरण्याची क्षमता त्याच्यात आहे. संघातील खेळाडूंशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधण्याचे तंत्रही त्याला अवगत आहे, हे आयपीएलच्या सामन्यांमध्ये सर्वानाच अनुभवयास मिळाले. त्याचा हा अनुभव भारतीय संघातील खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत नक्कीच नवीन ऊर्जा निर्माण करण्यास फायदेशीर ठरेल.
4बांगरला इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये भारताचे शेर कशामुळे ढेर झाले, याचा अभ्यास आधी करावा लागेल.
4चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, गौतम गंभीर, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणो यांच्यासारखे दिग्गज खेळाडू फ्लॉप का झाले, ते कोणत्या दडपणाखाली खेळत होते का, तेथील खेळपट्टीवर जम बसण्याआधीच हे भारताचे शेर तंबूत का परतत होते, याची कारणो शोधावी लागणार आहेत.
4डंकन फ्लेचर यांनी त्यांच्या फलंदाजाच्या शैलीत किंवा फलंदाजीस उभे (स्टान्स) घेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे का, हेसुद्धा तपासावे लागणार आहे. त्याची खरी कसोटी आहे, ती फलंदाजांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करून त्यांची गाडी रुळावर कशी येईल हे पाहणो.
4भारतीय संघाचे आधारस्तंभ असलेल्या फलंदाजांच्या तंत्रतील उणिवा शोधून त्यात सुधारणा करावी लागेल. त्यासाठी खेळाडूंना मानसिकदृष्टय़ा कणखर बनविण्याचे आव्हान पेलावे लागेल.
4संघातील फलंदाजांना त्यांच्यातील गुणवत्तेची जाणीव करून देणो. आता भारतीय संघाला एका अशा मार्गदर्शकाची गरज आहे, की जो त्याच्या खोलवर मनात जाऊन त्याच्या अडचणी समजावून घेऊन त्याला मार्ग दाखवेल. ही क्षमता बांगरमध्ये आहे.