भारतात बुंदेस लीग स्पर्धा लोकप्रिय : मोदी

By Admin | Updated: May 31, 2017 00:42 IST2017-05-31T00:42:50+5:302017-05-31T00:42:50+5:30

जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी जर्मनीने केलेल्या गुंतवणुकीचे

Bundesliga league competition popular in India: Modi | भारतात बुंदेस लीग स्पर्धा लोकप्रिय : मोदी

भारतात बुंदेस लीग स्पर्धा लोकप्रिय : मोदी

बर्लिन : जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी जर्मनीने केलेल्या गुंतवणुकीचे कौतुक केले. या वेळी त्यांनी, ‘जर्मनीची फुटबॉल लीग बुंदेस लीग भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे,’ असे सांगितले.
‘जर्मनीबरोबर आणखी संबंध चांगले करण्याच्या प्रयत्नात भारत इच्छुक आहे. यासह भारत अधिक यश मिळवण्याचा प्रयत्न करेल,’ असेही मोदी यांनी या वेळी सांगितले. या दौऱ्यात भारत आणि जर्मनीने एकूण १२ करारांवर स्वाक्षरी केली असून यामध्ये युवा विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांचाही समावेश आहे. या वेळी, मोदी यांनी भारतातील बुंदेस लीग स्पर्धेच्या लोकप्रियतेची माहिती दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Bundesliga league competition popular in India: Modi