दबंग दिल्लीला बुल्सची धडक
By Admin | Updated: July 27, 2014 01:27 IST2014-07-27T01:27:03+5:302014-07-27T01:27:03+5:30
बंगळुरू बुल्स संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीला जोरदार धडक मारताना प्रो कबड्डीच्या पहिल्याच सामन्यात 47-28 अशी शानदार विजयी सलामी दिली.

दबंग दिल्लीला बुल्सची धडक
रोहित नाईक - मुंबई
कर्णधार मनजीत चिल्लर याच्य एकहाती खेळीच्या जोरावर बंगळुरू बुल्स संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात दबंग दिल्लीला जोरदार धडक मारताना प्रो कबड्डीच्या पहिल्याच सामन्यात 47-28 अशी शानदार विजयी सलामी दिली.
सामन्याच्या सुरुवातीला दिल्ली संघाने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या पाच मिनिटांच्या खेळात आघाडी मिळवली होती. मात्र यानंतर बंगळुरू संघाच्या खेळाडूंनी अचानकपणो आक्रमक पवित्र घेताना दिल्लीकरांवर दडपण आणण्यास सुरुवात केली. कर्णधार मनजीत सिंगने या वेळी चढाई व आक्रमणात मोलाची भूमिका बजावताना बंगळुरू संघाला आघाडीवर नेले. मध्यंतराला बंगळुरूने 27-13 अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मध्यंतरानंतर त्यात 2क् गुणांची भर घालत दिल्लीचा 47-28 असा धुव्वा उडवला आणि विजयी सलामी दिली.