Breaking : भारताच्या अमित पांघलने इतिहास रचला; जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 04:22 PM2019-09-20T16:22:23+5:302019-09-20T16:26:47+5:30

आशियाई पदक विजेत्या भारताच्या अमित पांघलने शुक्रवारी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.

Breaking : Amit Panghal creates history as he becomes 1st Indian male pugilist ever to enter Final of World Boxing Championships  | Breaking : भारताच्या अमित पांघलने इतिहास रचला; जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

Breaking : भारताच्या अमित पांघलने इतिहास रचला; जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

Next

आशियाई पदक विजेत्या भारताच्या अमित पांघलने शुक्रवारी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. अमितने पुरुषांच्या 52 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकस्तानच्या साकेन बिबोसीनोव्हचा 3-2 असा पराभव केला. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. पण, 63 किलो वजनी गटात मनिष कौशिकला उपांत्य फेरीत हार मानावी लागली. 
 


अमितने 2018च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 2017 मध्ये कांस्य आणि 2019 मध्ये सुवर्णपदक जिंकले.

गतविजेत्या क्युबाच्या क्रुझ गोमेजने भारतीय बॉक्सरवर विजय मिळवला. कौशिकला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

Web Title: Breaking : Amit Panghal creates history as he becomes 1st Indian male pugilist ever to enter Final of World Boxing Championships 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.