ब्राझीलची ‘सोळा आणे’ धडक
By Admin | Updated: June 25, 2014 02:11 IST2014-06-25T02:11:36+5:302014-06-25T02:11:36+5:30
स्टार खेळाडू नेयमारने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर ब्राझीलने सोमवारी कॅमरूनचा 4-1 ने पराभव करीत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकाविले

ब्राझीलची ‘सोळा आणे’ धडक
>ब्रासिलिया : स्टार खेळाडू नेयमारने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर ब्राझीलने सोमवारी कॅमरूनचा 4-1 ने पराभव करीत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकाविले आणि फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपउपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला चिलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
बार्सिलोनाच्या फॉरवर्ड नेयमारने 17व्या मिनिटाला गोल नोंदविला. जोएल माटिपने त्यानंतर कॅमरुन संघाला बरोबरी साधून दिली, पण मध्यंतरापूर्वी नेयमारने पुन्हा एकदा गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. दुस:या सत्रत सुरुवातीला फ्रेडने ब्राझीलतर्फे तिसरा गोल नोंदविला, तर बदली खेळाडू फर्नाडिन्होने संघातर्फे चौथ्या गोलची नोंद केली. नेयमारने लुइस गुस्तोव्होच्या क्रॉसवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. त्यानंतर कॅमरूनने 26 व्या मिनिटाला बरोबरी साधली़ नेयमारने 34व्या मिनिटाला यजमान संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली.
ादुस:या सत्रच्या चौथ्या मिनिटाला फ्रेडने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फर्नाडिन्होने संघातर्फे तिसरा गोल नोंदवत प्रशिक्षकाचा विश्वास सार्थ ठरविला. (वृत्तसंस्था)
100 वा सामना
अन् 100 वा गोल
हा सामना ख:या अर्थाने क्रीडाप्रेमींसाठी यादगार ठरला़ कारण वर्ल्डकपमधील ब्राझीलचा हा 1क्क् वा सामना होता़ याच लढतीत ब्राझीलच्या नेयमार याने नोंदविलेला या विश्वचषकातील 1क्क् वा गोल ठरला़