ब्राझीलच्या सर्मथकांनी इंग्लंडच्या सर्मथकांवर फटाके फेकले
By Admin | Updated: June 21, 2014 00:13 IST2014-06-20T21:24:50+5:302014-06-21T00:13:19+5:30
पोलिसांनी साओ पाउलोच्या एका बारमध्ये इंग्लंडच्या सर्मथकांवर फटाके फेकल्याबद्दल 14 ब्राझीली नागरिकांना अटक केली आह़े

ब्राझीलच्या सर्मथकांनी इंग्लंडच्या सर्मथकांवर फटाके फेकले
14 जणांना अटक
साओ पाउलो: पोलिसांनी साओ पाउलोच्या एका बारमध्ये इंग्लंडच्या सर्मथकांवर फटाके फेकल्याबद्दल 14 ब्राझीली नागरिकांना अटक केली आह़े इंग्लंड विश्वकप सामन्यापूर्वी ही घटना घडली़ सर्मथक इंग्लंड विरुद्ध उरुग्वेचा सामना पाहण्यासाठी येथे एकत्रित जमले होत़े पोलीस प्रवक्ते रौमुलो गाब्रेटे लारा यांनी सांगितले की, ब्राझीलच्या सर्मथकांनी छोटे फटाके या इंग्लंडच्या सर्मथकांवर फेकल़े या फटाक्यांचा वापर जूनमध्ये होणार्या ब्राझीलच्या पारंपरिक महोत्सवामध्ये केला जातो़ प्रवक्त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे पावडर होती़ हा खूप मोठय़ाने आवाज करतोय़ मात्र जळत नाही़ हे इंग्लंडच्या सर्मथकांवर फेकण्यात आल़े जे लोक बारमध्ये होते, ते पळत सुटले तेव्हा गोंधळ झाला़ चेंगराचेंगरी झाली़ मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झालेला नाही, त्यामुळे कोणालाही रुग्णालयात पाठविले गेले नाही़ (वृत्तसंस्था)