ब्राझीलची टक्कर तिखट चिलीशी

By Admin | Updated: June 28, 2014 00:29 IST2014-06-28T00:29:56+5:302014-06-28T00:29:56+5:30

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत शनिवारी होणा:या लढतीत यजमान ब्राझीलसमोर जॉयंट किलर चिलीचे आव्हान असेल़

The Brazilian Coping Chilli | ब्राझीलची टक्कर तिखट चिलीशी

ब्राझीलची टक्कर तिखट चिलीशी

>बेलो होरिजोंटे : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत शनिवारी होणा:या लढतीत यजमान ब्राझीलसमोर जॉयंट किलर चिलीचे आव्हान असेल़ ब्राझील संघ घरच्या मैदानावर स्टार स्ट्रायकर नेयमारच्या बळावर चिलीला स्पर्धेतून बाहेर करण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर चिली संघ ब्राझील संघाला पाणी पाजून स्पर्धेच्या पुढच्या फेरीत मजल मारण्यासाठी उत्सुक आह़े 
ब्राझीलने वर्ल्डकपच्या साखळी फेरीतील आपल्या अंतिम लढतीत कॅमेरूनचा 4-1 असा धुव्वा उडविला होता़ या विजयामुळे ब्राझील संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आह़े बाद फेरीत ब्राझीलला आता चिलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आह़े विशेष म्हणजे, चिली संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्यांनी जागतिक क्रमवारीतील नंबर वन आणि गतविजेत्या स्पेनवर 2-क् असा सनसनाटी विजय 
मिळवून सर्वाना आश्चर्यचकित 
केले होत़े  ब्राझीलने 1998 आणि 2क्1क्च्या  वर्ल्डकपमध्ये बाद फेरीत चिली संघाला घरचा रस्ता दाखविला  होता़ 1962 मध्येही ब्राझीलने चिलीला विजय मिळवून वर्ल्डकपमधून बाहेर केले होत़े त्यामुळे इतिहास ब्राझीलच्या बाजूने असल्यामुळे या लढतीत चिलीला सावध खेळ करावा लागणार आह़े 
बाद फेरीच्या सामन्यात ब्राझील संघाला स्टार खेळाडू नेयमारकडून 
पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल़ चिलीला स्ट्रायकर एलेक्सिस सांचेजकडून विशेष कामगिरीची अपेक्षा असेल़ नेयमार आणि सांचेज हे बार्सिलोना संघातील साथीदार आहेत़ मात्र, वर्ल्डकपमधील सामन्यांत हे खेळाडू एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आतुर असतील़ ब्राझीलने आपल्या गटात जबरदस्त कामगिरी करताना क्रोएशिया आणि कॅमेरूनविरुद्धच्या लढतीत विजय मिळविला होता,तर मेक्सिकोविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता़  चिली संघ आपल्या गटात हॉलंडनंतर दुस:या क्रमांकावर राहिला होता; मात्र ज्या प्रकारे त्यांनी गतविजेत्या स्पेनचा धुव्वा उडवून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला, त्यावरून जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणा:या ब्राझीलला चिलीविरुद्धच्या लढतीत सावध राहावे लागेल़ (वृत्तसंस्था)
 
हेड टू हेड..
ब्राझील व चिली हे संघ आतार्पयत 68 वेळा आमनेसामने आले. त्यात ब्राझीलने  48 सामने जिंकले आहेत. चिलीला केवळ 7 सामन्यांत विजय मिळाला. यातील 13 सामने अनिर्णित राहिले. उभय संघांत एकूण 217 गोलची नोंद झाली. त्यात ब्राझीलकडून 159 तर चिलीकडून 58 गोल नोंदवण्यात आले.
 
आताच्या विश्वचषकात..
ब्राझील-चिली यांनी प्रत्येकी 3 
सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी 
प्रत्येकी 2 सामने जिंकले. ब्राझीलचा 
एक सामना अनिर्णित तर चीलीने 1 
सामना गमावला. ब्राझीलने 7 तर चिलीने 5 गोल नोंदवले. ब्राझीलचा गोल नोंदवण्याचा अटेम्प्ट रेट हा 7क् टक्के तर चिलीचा 6क् टक्के एवढा आहे. 
 
ब्राझील : ज्युलियो सीजर, डॅनियल एल्वेस, थिआगो सिल्वा, डेव्हिड लुईज, फर्नाडिन्हो, मार्सेलो, ऑस्कर, गुस्ताओ, हल्क, फ्रेड, नेयमाऱ 
चिली : क्वाडिवा ब्राव्हो, मोरिसियो, इसला, गॅरी मेडेल, गोन्जाओ जारा, युजेनिओ मेना, चाल्र्स एरेग्विज, मार्सेलो डिआज, फ्रन्सिस्को सिल्वा, उर्तरो विडाल, एलेस्सिस सांचेज, एडवडरे वर्गास़
 
दिनांक सामनास्थळ वेळ
29 जूननेदरलॅँड्स वि. फोर्तालेझारात्री 9:3क्
मेक्सिको
3क् जूनकोस्टारिका वि. रेसिफरात्री 1:3क्
ग्रीस
3क् जूनफ्रान्स वि. ब्राझीलियारात्री 9:3क्
नायजेरिया
1 जुलैजर्मनी वि. पोर्ता आलेग्रेपहाटे 1:3क्
अल्जीरिया
1 जुलैअर्जेटिना वि. साओ पावलोरात्री 9:3क्
स्वित्ङरलड
2 जुलैबेल्जियम वि. साल्वाडोरपहाटे 1:3क्
अमेरिका

Web Title: The Brazilian Coping Chilli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.