ब्राझीलचे ला ला ला!
By Admin | Updated: June 29, 2014 01:51 IST2014-06-29T01:51:43+5:302014-06-29T01:51:43+5:30
अद्भुत आणि अवर्णनीय सामन्यात अखेर नेयमारने मारलेल्या विजयी गोलवर ब्राझील थिरकला आणि चिलीचे शूट‘आऊट’ झाले.

ब्राझीलचे ला ला ला!
>नेयमारचा विजयी गोल : ज्युलिओ सेसरचा करिष्मा
बेलो होरिझोंटे : श्वास रोखून धरायला लावणारी 12क् मिनिटे.. 1-1 अशा बरोबरीनंतर आव्हान टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेली प्रत्येक खेळाडूची झुंज.. आणि त्यानंतर छातीचे ठोके वाढवणारे पेनल्टी शूटआऊट.. अशा अद्भुत आणि अवर्णनीय सामन्यात अखेर नेयमारने मारलेल्या विजयी गोलवर ब्राझील थिरकला आणि चिलीचे शूट‘आऊट’ झाले. या विजयात नेयमारपेक्षा महत्वाची भूमिका बजावली ती गोलकिपर ज्युलिओ सेसर याने. त्याने चिलीचे वार यशस्वीपणो परतवले आणि यजमानांच्या विजयावर 3-2 असे शिक्कामोर्तब केले.
त्याआधी निर्धारित वेळेत उभय संघ 1-1 ने बरोबरीत होते. दोन्ही संघांनी मध्यंतरार्पयत गोल नोंदविले हे विशेष. उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आल्यामुळे 3क् मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. पण त्यातही निकालाची कोंडी फुटू शकली नव्हती. अखेर पेनल्टी शूट आऊटचा सामन्यात अवलंब झाला. ब्राझीलकडून डेव्हिड लुईस, मार्सिलो आणि नेयमार यांनी गोल केले, तर विलियन आणि हल्क यांचा नेम चुकला.
चिलीकडून चाल्र्स अरांगुईज आणि डियाज यांनीच ज्युलियो सेसरला चकविले. सेसरने चिलीचे खेळाडू मार्सियो पिनिला, अॅलेक्सी सांचेज आणि गोंजालो जारा यांचे शॉट रोखून ब्राझीलच्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली.
उत्तरार्धात दोन्ही संघांना अनेकदा गोल नोंदवून आघाडी मिळविण्याची संधी चालून आली.
पण ऐनवेळी वेध चुकल्यामुळे सर्व प्रय}ांवर पाणी फेरले गेले. ब्राझीलकडून हल्क याने एक गोल नोंदविताच यजमान संघाच्या तंबूत आनंदाला उधाण आले होते. स्वत: खेळाडूंचा मैदानावर जल्लोष सुरू झाला. तथापि रेफ्रीने हा गोल नाकारताच त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. ब्राझीलच्या खेळाडूंनी रेफ्रीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रेफ्रीने कुठलेही नमते न घेता हल्कला यलो कार्ड दाखविले.
यजमान ब्राझील संघ सुरुवातीला दडपणाखाली दिसला, पण त्यानंतर मात्र त्यांना सूर गवसला. पाचवेळा जेतेपदाचा मान मिळविणा:या ब्राझील संघाने 18 व्या मिनिटाला शेजारच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध आघाडी मिळविली. लुईजच्या या गोलमध्ये नेयमारची भूमिका महत्त्वाची ठरली.
26 व्या मिनिटाला नेयमारने एक चांगली चाल रचली, पण त्याला गोलजाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले. 32 व्या मिनिटाला सांचेजने मिळालेल्या संधीचे सोनं करताना चिली संघाला बरोबरी साधून दिली. (वृत्तसंस्था)
04 वेळा ब्राझीलने विश्वचषक इतिहासात पेनल्टी शुटआऊटमध्ये बाजी मारली. याआधी फ्रान्स (1986), इटली (94) आणि हॉलंड (98) यांना ब्राझीलने नमवले.
07 वेळा ब्राझील एक्स्ट्रा टाईममध्ये सामना खेळले. यात 1938 साली पोलंडविरुद्धच्या लढतीत त्यांना एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करण्यात यश आले होते.
1934 साली विश्वचषक स्पध्रेत पहिल्यांदा पेनल्टी शुटआऊटमध्ये लढत खेळली गेली होती. फ्रान्सने 3-2 अशा फरकाने ऑस्ट्रीयाला नमवले होते.