बॉक्सर खेळणार तिरंग्याखाली
By Admin | Updated: September 17, 2014 02:11 IST2014-09-17T02:11:38+5:302014-09-17T02:11:38+5:30
बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) भारतीय मुष्टियोद्धय़ांना आशियाई स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाखाली सहभाग घेण्यास मंजुरी दिली आह़े

बॉक्सर खेळणार तिरंग्याखाली
>मुंबई : बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) भारतीय मुष्टियोद्धय़ांना आशियाई स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाखाली सहभाग घेण्यास मंजुरी दिली आह़े
‘एआयबीए’च्या निर्णयामुळे दक्षिण कोरियातील इंचियोनमध्ये जर भारतीय बॉक्सरने सुवर्णपदक मिळविले, तर पदक वितरण सोहळ्यात राष्ट्रगीतही वाजविण्यात येईल़ एआयबीएचे भारतीय प्रतिनिधी आणि वरिष्ठ बॉक्सिंग अधिकारी किशन नरसी यांनी सांगितले की, एआयबीएने भारतीय बॉक्सरना आशियाई स्पर्धेत भारतीय ध्वजाखाली खेळण्यास मंजुरी दिली आह़े तसेच आता बॉक्सिंग इंडियाला भारतीय ऑलिम्पिक संघाच्या सदस्यतेसाठी अर्ज करावा लागणार आह़े
2क्12मध्ये निवडणुकीतील संभाव्य गैरव्यवहाराआधीच त्याची दखल घेत एआयबीएने भारतीय हौशी मुष्टियुद्ध संघावर (आयएबीएफ) निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात एआयबीएने कठोर पाऊल उचलताना आयएबीएफची मान्यता रद्द केली होती. यामुळे सहाजिकच भारतीय क्रीडाविश्वात मोठी खळबळ उडाली होती.
अलीकडील काळात एआयबीएने आपली भूमिका काहीशी मवाळ करीत ‘बॉक्सिंग इंडिया’ला तात्पुरती मान्यता प्रदान केली. मुष्टियुद्ध संघटनेतील पदाधिकारी आपसातील मतभेद बाजूला सारून मागील आठवडय़ात निवडणुकीला सामोरे गेले.
एआयबीएचे अध्यक्ष चिंग-कुओ वू यांनी बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जाजोडिया यांना पत्र लिहून त्याचे अभिनंदन केले. ‘आता आगामी काळात बॉक्सिंग इंडियाच्या नव्या कार्यकारिणीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता मिळवण्यासाठी पावले उचलावीत,’’ अशी वडीलकीची सूचना एआयबीएने केली.
बॉक्सिंग इंडिया या नव्या संघटनेची स्थापन केल्याबद्दल मी संघटनेचे अध्यक्ष संदीप जाजोडिया आणि पदाधिका:यांचे अभिनंदन करतो. या संघटनेने आगामी काळातील वाटचालीत लोकशाही पद्धत, पारदर्शकता यांना महत्त्व देऊन एआयबीएच्या नियमांनुसार कारभार करावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.
- चिंग-कुओ वू,
अध्यक्ष, एआयबीए