बॉक्सर अमितची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:40 IST2018-09-12T01:40:14+5:302018-09-12T01:40:16+5:30

आशियाई गेम्समधील सुवर्णपदक विजेता बॉक्सर अमित पांगलची भारतील बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

 Boxer Amit is recommended for the Arjuna Award | बॉक्सर अमितची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

बॉक्सर अमितची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली : आशियाई गेम्समधील सुवर्णपदक विजेता बॉक्सर अमित पांगलची भारतील बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
अमितने लाईट फ्लायवेट (४९ किलो) गटात विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन हसनब्वाय दुसमातोव्हचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले. अमित व्यतिरिक्त बॉक्सिंग महासंघाने सोनिया लाठेर व गौरव बिधुडी यांच्या नावांचीही शिफारस केली आहे. आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणारा आठवा भारतीय बॉक्सर ठरलेला अमित म्हणाला, ‘अर्जुन पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस होणे सन्मानाची बाब आहे. मी आपला आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझे पदकच सर्वकाही सांगून जाते आणि मी त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील होतो.’

Web Title:  Boxer Amit is recommended for the Arjuna Award