या बॉलरने एकट्याने गारद केला अख्खा संघ, 9 जण क्लीन बोल्ड
By Admin | Updated: January 12, 2017 19:07 IST2017-01-12T18:44:02+5:302017-01-12T19:07:40+5:30
विशेष म्हणजे 10 विकेट घेण्यासाठी त्याला एकाही क्षेत्ररक्षकाची आवश्यकता भासली नाही. 10 पैकी 9 जणांना त्याने क्लिन बोल्ड केलं तर एकाला पायचीत पकडलं.

या बॉलरने एकट्याने गारद केला अख्खा संघ, 9 जण क्लीन बोल्ड
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि.12 - पाकिस्तानमधील कराचीतला जलदगती गोलंदाज मोहम्मद अली याने एक असा विक्रम केला आहे, जे कोणत्याही गोलंदाजाचं स्वप्न असतं. 19 वर्षांखालील आंतरजिल्हा सामन्यात या खेळाडूने विरोधी संघाचे सर्व 10 खेळाडू बाद करण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे 10 विकेट घेण्यासाठी त्याला एकाही क्षेत्ररक्षकाची आवश्यकता भासली नाही. मोहम्मद अलीने 10 पैकी 9 जणांना क्लीन बोल्ड केलं, तर एकाला पायचीत पकडलं.
या जिल्हास्तरीय सामन्याला अधिकृत दर्जा नसल्याने मोहम्मद अलींच्या उल्लेखनीय प्रदर्शनाची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये होऊ शकली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या नईम अख्तर, शाहिद महबूब, इमरान आदिल आणि जुल्फिकार बाबर या 4 गोलंदाजांनी एका डावात 10 विकेट घेतल्या आहेत.
जिम लेकरही असं करू शकले नव्हते
61 वर्षांपूर्वी इंग्लंडविरोधात ऑफ ब्रेक गोलंदाज जिम लेकरने ऑस्ट्रेलियाच्या एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या, मात्र हा दिग्गज केवळ दोन खेळाडूंना बोल्ड करू शकला होता.
कुंबळेलाही टाकलं मागे
18 वर्षांपूर्वी भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर 10 विकेट घेतल्या होत्या, मात्र कुंबळेही केवळ 2 खेळाडूंना बोल्ड करू शकला होता.