मॅथ्यूजच्या हेल्मेटवर आदळला ‘बाऊन्सर’

By Admin | Updated: August 31, 2016 20:12 IST2016-08-31T20:12:47+5:302016-08-31T20:12:47+5:30

श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बुधवारी मैदानावर बराच वेळ तळमळत राहिला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वन डे लढतीत बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळताच डोक्याच्या

'Bouncer' hit on Mathews helmet | मॅथ्यूजच्या हेल्मेटवर आदळला ‘बाऊन्सर’

मॅथ्यूजच्या हेल्मेटवर आदळला ‘बाऊन्सर’

ऑनलाइन लोकमत
दाम्बुल्ला, दि. 31 -  श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बुधवारी मैदानावर बराच वेळ तळमळत राहिला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वन डे लढतीत बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळताच डोक्याच्या मागच्या भागाचा बचाव करण्यासाठी लावलेली हेल्मेटपट्टी क्षणात तुटली.
वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅन्ड याचा बाऊन्सर मॅथ्यूजच्या हेल्मेटवर आदळल्यानंतर काही मिनिटांसाठी खेळ थांबवावा लागला होता. यामुळे २०१४ मध्येआॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्यूज याच्या मृत्यूच्या घटनेची आठवण ताजी झाली. चेंडू आदळल्यानंतर बराच वेळ मॅथ्यू डोके धरून बसला. लंकेचे फिजिओ पॉल क्लारेनार यांनी त्याला सावरले. पंचांनी देखील ड्रिंक्सची वेळ घोषित केली. त्यानंतर मॅथ्यू मांसपेशी ताणल्या गेल्याचे कारण सांगून मैदानाबाहेर गेला.

 

 

Web Title: 'Bouncer' hit on Mathews helmet