शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही हात नाहीत, तरीही करतो फलंदाजी अन गोलंदाजी

By admin | Updated: March 7, 2016 12:14 IST

दोन्ही हात नाहीत अन् क्रिकेट खेळू शकतो, अशी कल्पना कोणी करू शकतो का? परंतु, आमिर हुसेन लोन हा तरुण फक्त क्रिकेट खेळतच नाही, तर तो जम्मू काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे.

बिजबेहडा (जम्मू काश्मीर) : दोन्ही हात नाहीत अन् क्रिकेट खेळू शकतो, अशी कल्पना कोणी करू शकतो का? परंतु, आमिर हुसेन लोन हा तरुण फक्त क्रिकेट खेळतच नाही, तर तो जम्मू काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे.महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जबरदस्त चाहता असलेल्या आमीरचे स्वप्न क्रिकेटपटू बनण्याचे होते; पण त्याच्या वडिलांच्या बॅट बनविण्याच्या कारखान्यात झालेल्या एका अपघातात आमीरने त्याचे दोन्ही हात गमावले. तरीही त्याचे स्वप्न थांबले नाही. श्रीनगरपासून ४२ कि.मी. अंतरावर असलेल्या वैगम गावात राहणारा आमीर वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, की मी सचिनचा फॅन असून त्याच्यासारखेच राष्ट्रीय संघातून खेळण्याची इच्छा बाळगून होतो. तो माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. अपघात झाला तेव्हा आमीर सात वर्षांचा होता. त्याला जीवदान देण्यात डॉक्टरांबरोबरच लष्कराचेही मोठे योगदान आहे. परंतु, तो आज जे स्वप्न जगतोय त्याचे श्रेय तो वडिलांना देतोय, ज्यांनी त्याच्या उपचारासाठी आपल्या आयुष्याची सर्व जमा पुंजी संपवली.१९९७ साली तो वडिलांच्या कारखान्यात मोठ्या भावासाठी दुपारचे जेवण घेऊन गेला होता. भाऊ जेवत असताना आमीरने बॅट तयार करण्यासाठी वापरात येणारी आरा मशिन सुरू केली. यात कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून त्याचे दोन्ही हात कट झाले होते. (वृत्तसंस्था)