तिरंदाज महिला एकेरी फेरीत बोमबायला देवीचा विजय

By Admin | Updated: August 10, 2016 18:43 IST2016-08-10T18:43:53+5:302016-08-10T18:43:53+5:30

भारतीय महिला तिरंदाज बोमबायला देवीने एकेरीतील पहिल्या फेरीत विजय संपादन केला आहे.

Bombala Devi's victory in Archery Women's Singles Tournament | तिरंदाज महिला एकेरी फेरीत बोमबायला देवीचा विजय

तिरंदाज महिला एकेरी फेरीत बोमबायला देवीचा विजय

ऑनलाइन लोकमत

रिओ डि जानिरो, दि. 10 - भारतीय महिला तिरंदाज बोमबायला देवीने एकेरीतील पहिल्या फेरीत ऑस्ट्रिया विरुद्धच्या लढतीत विजय संपादन केला आहे. या विजयामुळे भारतीय खेळाडूंच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. बोमबायला देवीची लढत ऑस्ट्रियाच्या लॉरेन्स बाल्डॉफविरुद्ध असतानाच लॉरेन्सने पहिला सेट जिंकल्यानं बोमबायला देवीला हार पत्करावी लागली होती.

मात्र दुसऱ्या फेरीत बोमबायला देवीनं चमकदार खेळीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात 10 गुण मिळवले आणि लॉरेन्सवर दडपण आले. त्यानंतर सलग दोनदा नऊ गुण घेत तिने 28 गुणांची कमाई केली. त्याच वेळी लॉरेन्सचे हा सेट गमवावा लागला. तिसऱ्या सेटमध्येही बोमबायला देवीने सलग तीन वेळा नऊ गुण मिळविले, तर लॉरेन्सने 7, 7, 9 असे गुण मिळविल्याने ती फेरीदेखील बोमबायला देवीनं जिंकली.

चौथ्या सेटमध्ये लॉरेन्सने पहिल्याच प्रयत्नात दहा गुण मिळवले. दुसऱ्या प्रयत्नांत तिला सहाच गुणांवर समाधान मानावं लागलं. बोमबायला देवीने सलग दोनदा नऊ गुण मिळवित आघाडी घेतल्यानं सामना जिंकला आहे.

Web Title: Bombala Devi's victory in Archery Women's Singles Tournament