ब्लॅकवरील बंदीची शिक्षा घटविली

By Admin | Updated: May 5, 2014 14:34 IST2014-05-04T23:54:09+5:302014-05-05T14:34:33+5:30

आंतरराष्ट्रीय खेल पंचाटने जमैकाची ऑलिम्पियन धावपटू डोमिनिक ब्लॅकवर दुसर्‍या डोपिंगच्या आरोपामुळे लादण्यात आलेली सहा वर्षांची बंदीची शिक्षा 18 महिन्यांनी घटविण्यात आली़

Black banned punishment | ब्लॅकवरील बंदीची शिक्षा घटविली

ब्लॅकवरील बंदीची शिक्षा घटविली

आंतरराष्ट्रीय खेल पंचाटने जमैकाची ऑलिम्पियन धावपटू डोमिनिक ब्लॅकवर दुसर्‍या डोपिंगच्या आरोपामुळे लादण्यात आलेली सहा वर्षांची बंदीची शिक्षा 18 महिन्यांनी घटविण्यात आली़
पंचाटने सांगितले की, 27 वर्षीय 400 मी़ पल्ल्याची धावपटू ब्लॅकवर आता साडेचार वर्षांची बंदी राहील़ ही बंदीची शिक्षा 1 जुलै 2012 पासून लागू असेल़ प्रतिबंध घटविल्यानंतर ब्लॅक आता आपली कारकीर्द जानेवारी 2017 च्या अखेरीस सुरु करू शकणार आह़े जमैकाच्या डोपिंगविरोधी चौकशी समितीने ब्लॅकवर दुसर्‍यांदा डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर 13 जून 2013 ला सहा वर्षांची बंदी लादण्यात आली होती़ ब्लॅकने याविरुद्ध आंतरराष्ट्रीय खेल पंचाटने अपील केली होती़ ब्लॅकवर यापूर्वीदेखील 2006 मध्ये ड्रग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर 9 महिन्यांची बंदी लादण्यात आली होती़ ती लंडन ऑलिम्पिकसाठी जमैकाच्या ट्रायलमध्ये सहाव्या स्थानावर राहिली होती आणि तिची रिले संघामध्ये निवड झाली होती़ मात्र तिने या खेळामध्ये भाग घेतलेला नव्हता़ जमैकाची महिला रिले संघाने लंडन ऑलिम्पिकमध्ये चार गुणांसह 400 मी़ रिलेमध्ये तृतीय स्थान पटकावून कांस्यपदक जिंकले होत़े (वृत्तसंस्था)

Web Title: Black banned punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.