बिंद्रांनी अध्यक्षपद सोडले

By Admin | Updated: August 24, 2014 00:55 IST2014-08-24T00:55:27+5:302014-08-24T00:55:27+5:30

क्रिकेट प्रशासक म्हणून 36 वर्षाच्या कारकिर्दीनंतर इंद्रजितसिंग बिंद्रा यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (पीसीए) अध्यक्षपद सोडले.

Bindra left the presidency | बिंद्रांनी अध्यक्षपद सोडले

बिंद्रांनी अध्यक्षपद सोडले

चंडीगड : क्रिकेट प्रशासक म्हणून 36 वर्षाच्या कारकिर्दीनंतर इंद्रजितसिंग बिंद्रा यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (पीसीए) अध्यक्षपद सोडले. त्यांच्या स्थानी वरिष्ठ आयएएस अधिकारी व पीसीएचे उपाध्यक्ष डी. पी. रेड्डी यांची निवड झाली. पीसीए कार्यकारी समितीच्या शनिवारी मोहाली येथील पीसीए स्टेडियममध्ये झालेल्या बैठकीत हे दोन्ही निर्णय घेण्यात आले. 
पीसीएचे सचिव एम. पी. पांडव यांच्या मते, 7क् वर्षाचे बिंद्रा यांच्या आग्रहानंतर चर्चा करण्यासाठी कार्यकारी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. संघटनेचे प्रशासकीय कार्य यापुढे सांभाळण्यास असमर्थ असल्याचे बिंद्रा यांनी म्हटले होते. त्यांनी कार्यकारी समितीला पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली होती. पांडव म्हणाले, ‘‘कार्यकारी समितीने बिंद्रा यांनी आतार्पयत दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि 56 वर्षाच्या रेड्डी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्याचा निर्णय घेतला.’’ 
कार्यकारी समितीने या वेळी विविध उपसमित्या स्थापन केल्या आणि पुढील महिन्यात आयोजित चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांच्या प्रभारी नियुक्तीचा निर्णय घेतला. बिंद्रा आज झालेल्या बैठकीमध्ये सहभागी झाले नव्हते. पीसीएचे सहसचिव वालिया म्हणाले, ‘‘पंजाब सरकारच्या अबकारी व कर विभागाचे वित्त आयुक्त रेड्डी आजपासून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Bindra left the presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.