भू़ म़ पुल्ली कन्या प्रशालेचे वूशू स्पर्धेत वर्चस्व

By Admin | Updated: September 4, 2015 22:45 IST2015-09-04T22:45:03+5:302015-09-04T22:45:03+5:30

सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा वूशू संघटना यांच्या विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत सौ़भू़म़ पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने वर्चस्व राखले़ या स्पर्धेतील प्रथम आलेल्या पाच खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़

Bhuju Puli Kanya School dominates the Wushu competition | भू़ म़ पुल्ली कन्या प्रशालेचे वूशू स्पर्धेत वर्चस्व

भू़ म़ पुल्ली कन्या प्रशालेचे वूशू स्पर्धेत वर्चस्व

लापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा वूशू संघटना यांच्या विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत सौ़भू़म़ पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने वर्चस्व राखले़ या स्पर्धेतील प्रथम आलेल्या पाच खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़
विजयी खेळाडू असे-
(४० किलो) सोनल मुनगा पाटील प्रथम, (४४ किलो) काजल इब्राहिमपुरे प्रथम, मेघा श्रीराम द्वितीय, (५२ किलो) आयेशा बाणेवाले, (५६ किलो) ऐश्वर्या वंगारी प्रथम, गीता भोसले द्वितीय, (६० किलो) वैष्णवी गुर्रम प्रथम, रुक्मिणी येमूल द्वितीय, (६५ किलो) यमुना मिठ्ठा प्रथम, (६५ किलोपुढील) स्वाती सरवदे प्रथम, कोमल वाघमारे द्वितीय़
यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक बाळकृष्ण गोटीपामूल, प्रसाद कर्रे, प्रशिक्षक सतीश चिंचकर, हरीश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, उपाध्यक्ष ॲड़ श्रीनिवास क्यातम, सचिव दशरथ गोप, सहसचिव श्रीधर चिट्याल, दिनेश यन्नम, हरीश कोंडा, प्राचार्य मधुकर गवळी यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
१९ वर्षांखालील जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत यश मिळविलेल्या सौ़भू़म़ पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंसोबत मधुकर गवळी, हरीश कोंडा, श्रीधर कनकुंटला, हरीश पटेल, मधुकर नादरगी, रमेश कोटा़

Web Title: Bhuju Puli Kanya School dominates the Wushu competition