महिला दिनानिमित्त विराट कोहलीच्या आईसोबत अनुष्कालाही शुभेच्छा

By Admin | Updated: March 8, 2017 13:44 IST2017-03-08T13:42:13+5:302017-03-08T13:44:27+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत

Best wishes to Anurakha along with Virat Kohli's mother on the occasion of the women's day | महिला दिनानिमित्त विराट कोहलीच्या आईसोबत अनुष्कालाही शुभेच्छा

महिला दिनानिमित्त विराट कोहलीच्या आईसोबत अनुष्कालाही शुभेच्छा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीने आपली आई सरोज कोहली आणि गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, 'सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. खासकरुन माझ्या आयुष्यात असलेल्या दोन शक्तिशाली महिलांना. माझ्या कठीण काळात काळजी घेत खंबीरपणे उभी राहणारी माझी आई, आणि चुकीच्या लोकांविरोधात उभी राहत योग्य गोष्टींचं समर्थन करणारी अनुष्का शर्मा'. विराट कोहलीने फोटो कोलाज करत एकाप्रकारे अप्रत्यक्षरित्या आई आणि अनुष्काची भेटच करुन दिली आहे. 
 
फोटो शेअर करताना विराट कोहलीने आई आणि अनुष्काची खास शैलीत स्तुती केली आहे. याआधीही विराट कोहलीने सोशल मीडियावर अनेकदा त्याच्या आणि अनुष्काच्या नात्यावर टिप्पणी करणा-यांना कडक शब्दांत सुनावलं असून महिलांचा सन्मान करण्याचा सल्ला दिला आहे. 
 
विराट कोहलीच्या वडिलांचं 18 डिसेंबर 2006 रोजी निधन झालं होतं. त्यावेळी विराट कोहली फक्त 18 वर्षांचा होता. त्यावेळी विराटच्या आईने पुर्णपणे पाठिंबा देत क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. गृहिणी असूनदेखील त्यांनी विराट कोहलीच्या आईने क्रिकेट करिअरसाठी पुर्ण समर्थन दिलं. 
 
विराट कोहली अनेकदा महिलांचा सन्मान आणि स्वातंत्र्यावर आपलं मत व्यक्त करत असतो. मैदानाच्या बाहेरदेखील विराटला जेंटलमन क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. 
 

Web Title: Best wishes to Anurakha along with Virat Kohli's mother on the occasion of the women's day