पुणे/कोल्हापूर : वयाच्या २५व्या वर्षी कुस्तीक्षेत्रातील एक मानदंड ठरलेली हिंदकेसरी गदा पटकावणाऱ्या गणपत आंदळकर यांनी स्पर्धात्मक कुस्ती खेळणे थांबविल्यानंतर या क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून स्वत:ला वाहून घेतले ते आजतागायत! पहाटे पाच आणि सायंकाळी चार वाजता श्री शाहू छत्रपती न्यू मोतीबाग तालमीत जाण्याचा शिरस्ता जोडला तो अखेरपर्यंत कायम होता.त्यांच्या चुरशीच्या झालेल्या लढती१९५८मध्ये नसीर पंजाबी याच्यासोबत गणपत आंदळकरांची कुस्ती झाली. खासबाग कुस्ती मैदानावर तीस हजार शौकिनांच्या साक्षीने आंदळकरांनी नसीरला चारी मुंड्या चितपट केले.१९६४ मध्ये सादिक पंजाबी या गाजलेल्या मल्लासोबत आंदळकरांची कुस्ती येथील खासबागेत झाली. शौकिनांची मैदानावर मोठी गर्दी केली होती. अर्धा तास चाललेल्या कुस्तीत आंदळकरांनी सादिकला ताकदीच्या जोरावर ताब्यात जखडून ठेवले. समोर पराभव दिसतोय म्हटल्यावर सादिकचे वडील निक्का पंजाबी यांनी कुस्ती सोडविण्याची विनंती पंचांकडे केली. त्यामुळे आंदळकर यांना विजयी घोषित करण्यात आले.१९६१ मध्ये शाहूपुरी तालमीचे नामवंत मल्ल महंमद हनीफ यांच्याबरोबरच्या लढतीत आंदळकर जिंकले. पोलीस कल्याण निधीसाठी कसबा बावडा येथील पोलीस मैदानावर ही कुस्ती झाली. त्यासाठी खास आखाडा तयार करण्यात आला होता. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्याशी आंदळकरांची कुस्ती मुंबईत झाली. दोघेही मल्ल कोल्हापूरचे आणि नावाजलेले असल्याने या कुस्तीकडे राज्यातील कुस्तीशौकिनांचे लक्ष लागले होते. एका चालीवेळी कुस्ती कडेला गेल्याने पंचांनी कुस्तीचा निकाल दिला नाही. या कुस्तीदरम्यान थोडा वादही झाला. शेवटी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.भूषविलेली पदेमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष.महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे सदस्य.कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष.राजर्षी छत्रपती मोतीबाग तालीम मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष.राज्य कुस्तीगीर परीषदेच्या चीफ पेट्रन कमिटीचे सदस्य.स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या पश्चिम विभागाचे संचालक.महाराष्ट्र राज्य स्पोर्ट्स कौन्सिलचे सदस्य.
आंदळकर सर्वोत्कृष्ट मल्ल ते आदर्श वस्ताद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 02:57 IST