आक्रमक अमेरिकेपुढे बेल्जियमची ‘कसोटी’

By Admin | Updated: July 1, 2014 00:59 IST2014-07-01T00:59:38+5:302014-07-01T00:59:38+5:30

बाद फेरीत पोहोचणारा अमेरिका संघ मंगळवारी फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत बेल्जियमविरुद्ध विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळविण्यासाठी आतुर असेल़

Belgium 'Test' ahead of aggressive US | आक्रमक अमेरिकेपुढे बेल्जियमची ‘कसोटी’

आक्रमक अमेरिकेपुढे बेल्जियमची ‘कसोटी’

>साल्वाडोअर : उत्कृष्ट गोलच्या सरासरीमुळे पोतरुगालवर मात करून बाद फेरीत पोहोचणारा अमेरिका संघ मंगळवारी फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत बेल्जियमविरुद्ध विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळविण्यासाठी आतुर असेल़ दुसरीकडे एच गटात 9 गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहिलेला बेल्जियम अमेरिकेला धूळ चारून अंतिम आठ संघांत स्थान मिळविण्यासाठी सवरेत्कृष्ट खेळ करण्यासाठी प्रयत्नशील राहील़ 
वर्ल्डकपच्या जी गटात अमेरिकेचे पोतरुगालच्या बरोबरीने प्रत्येकी 4 गुण होत़े मात्र, उत्कृष्ट गोलच्या सरासरीमुळे अमेरिकेला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला़ एच गटात बेल्जियमने 9 गुणांची कमाई केली होती़ त्यांनी साखळी लढतीत अल्जेरिया, रशिया आणि दक्षिण कोरिया संघांवर शानदार विजय मिळविला होता़ बेल्जियम संघातील स्टार खेळाडू रोमेलू लुकाकू, केविन डी़ ब्रुएने हे अमेरिकेला चांगले आव्हान देऊ शकतात़ 
अमेरिकेने साखळी लढतीत घाना आणि पोतरुगालला धूळ चारून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता़ आता उपउपांत्यपूर्व फेरीतही हा संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असेल़ त्यामुळे बेल्जियम आणि अमेरिका यांच्यातील सामना एकतर्फी होणार नाही हे निश्चित आह़े
बेल्जियमने यापूर्वी 1986 च्या वर्ल्डकपमध्ये सवरेत्कृष्ट कामगिरी केली आह़े तेव्हा या संघाने चौथे स्थान मिळविले होत़े अमेरिकेविरुद्ध जर बेल्जियमला विजय मिळवायचा असेल, तर आक्रमक खेळ करावा लागणार आह़े कारण वर्ल्डकपमध्ये आतार्पयत आक्रमक खेळाच्या बळावर अमेरिकेने विजय मिळविले आहेत़ या दोन्ही संघांतील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिना किंवा स्वित्ङरलड यांच्या लढतीतील विजेत्याशी झुंजणार आह़े (वृत्तसंस्था)
 
अमेरिका व बेल्जियम यापूर्वी चार वेळा आमने-सामने आले आहेत़ 
यापैकी बेल्जियमने तीन सामने जिंकले आहेत़ 
अमेरिकेला एकच सामना जिंकता आला आह़े 
अमेरिका सातव्यांदा वर्ल्डकपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आह़े 
बेल्जियम 2क्क्2 नंतर पहिल्यांदाच उपउपांत्यपूर्व फेरीत खेळत आह़े 

Web Title: Belgium 'Test' ahead of aggressive US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.