बेल्जियमने केला कोरियाचा १-० ने पराभव
By Admin | Updated: June 27, 2014 03:50 IST2014-06-27T03:50:36+5:302014-06-27T03:50:36+5:30
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एच गटात गुरूवारी कोरिया विरूध्द बेल्जियम यांच्यात झालेल्या सामन्यात बेल्जियम संघाने कोरियावर १-० अशी मात केली.

बेल्जियमने केला कोरियाचा १-० ने पराभव
>ऑनलाइन टीम
क्यूरिटा, दि. २७ - फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एच गटात गुरूवारी कोरिया विरूध्द बेल्जियम यांच्यात झालेल्या सामन्यात बेल्जियम संघाने कोरियावर १-० अशी मात केली. तर अल्जेरिया विरूध्द रशिया यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला.
गुरूवारी मध्यरात्री झालेल्या या सामन्यात बेल्जियमच्या व्हर्टोगेंन याने ७८ व्या मिनिटाला गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघाकडील एकाही खेळाडूला गोल करता न आल्याने बेल्जियम संघाने हा सामना १-० अशा फरकाने जिंकला. तर दुस-या एका सामन्यात अल्जेरिया विरूध्द रशिया यांच्यात झालेल्या सामन्यात रशियाच्या कोकोरिनने ६ व्या मिनिटाला गोल करीत संघाला १-० आघाडी मिळवून दिली.परंतू त्यानंतर ६० व्या मिनिटाला अल्जेरियाच्या स्लीमनीने गोल करीत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. दोन्ही संघाने बरोबरी साधली असतानाच सामन्याची वेळ संपल्याने हा सामना अनिर्णित राहिला.