अमेरिकेवर बेल्जियमची २-१ अशी मात
By Admin | Updated: July 2, 2014 05:58 IST2014-07-02T05:58:46+5:302014-07-02T05:58:46+5:30
अथक प्रयत्नांनी बेल्जियमने अमेरिकेवर २-१ अशी मात केली आहे. दोन्ही संघांत अतिशय काट्याची टक्कर झाल्याने खेळाच्या पहिल्या भागात कोणालाच गोल करता आला नाही

अमेरिकेवर बेल्जियमची २-१ अशी मात
ऑनलाइन टिम
साल्वाडोर, दि. २ - अथक प्रयत्नांनी बेल्जियमने अमेरिकेवर २-१ अशी मात केली आहे. दोन्ही संघांत अतिशय काट्याची टक्कर झाल्याने खेळाच्या पहिल्या भागात कोणालाच गोल करता आला नाही. परंतू दुस-या भागात ९३ व्या मिनिटाला केव्हिन दे ब्रुने याने पहिला गोल करत आपणच यशस्वी होणार असल्याचा संकेत प्रेक्षकांना दिला. यापूर्वी आपल्या खेळाची चमक दाखवलेल्या फेलानीने आज अनेकदा गोल करण्याचे प्रयत्न केले परंतू अमेरिकेचा गोलकिपर टिम हॉवर्ड याने फेलोनीसह त्याच्या सहका-यांचे प्रयत्न हाणून पाडले. दोन्ही संघांना मिळालेल्या अधिक वेळेत त्यांनी पून्हा जोरदार प्रयत्न केले. या वेळेसही बेल्जियमच्या रोमेलु लुकाकु ने १०५ व्या मिनिटाला गोल करत प्रेक्षकांच्या जल्लोषाला वाट मोकळी करून दिली. परंतू, दोनच मिनिटांच्या फरकाने अमेरिकेच्या ज्यूलियन ग्रीन ने गोल केला आणि अमेरिकन प्रेक्षकांच्या आशा काही काळापुरत्या पल्लवीत झाल्या. वेळ संपत आली असताना झालेल्या गोलने अमेरिकम प्रेक्षकांना जल्लोषाला फारशी संधी मिळाली नाही. सरते शेवटी बेल्जियमच्या विजयावर शिक्का मोर्तब झाल्याने बेल्जियमच्या प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आलं.