बेल्जियम अव्वल, आशियाई आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: June 28, 2014 00:15 IST2014-06-28T00:15:07+5:302014-06-28T00:15:07+5:30
यान वरटोनगेनच्या नेतृत्वाखालील बेल्जियम संघाने 1क् खेळाडूंसह दक्षिण कोरियाचा 1-क् ने पराभव करीत सलग तिसरा विजय नोंदविला

बेल्जियम अव्वल, आशियाई आव्हान संपुष्टात
>साओ पावलो : यान वरटोनगेनच्या नेतृत्वाखालील बेल्जियम संघाने 1क् खेळाडूंसह दक्षिण कोरियाचा 1-क् ने पराभव करीत सलग तिसरा विजय नोंदविला आणि विश्वकप फुटबॉल स्पर्धेत गटात अव्वल स्थान पटकाविले. दक्षिण कोरियाच्या पराभवामुळे फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत आशिया खंडातील अखेरची आशाही संपुष्टात आली.
प्रभारी कर्णधार वरटोनगेनने सामना संपायला 12 मिनिटांचा
अवधी शिल्लक असताना, नोंदविलेला गोल अखेर निर्णायक ठरला. बेल्जियमने ‘एच’ गटात 3 विजयासह
9 गुणांची कमाई करीत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. प्री-क्वॉर्टरफायनलमध्ये बेल्जियमला अमेरिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
दक्षिण कोरियाचा गोलकिपर किम स्युंग ग्यूने बदली खेळाडू डिव्होक ओरिजीचा फटका रोखला, पण रिबाऊंडवर मिळालेल्या संधीचा लाभ घेत वरटोनगेनने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी प्रदान केली.
दक्षिण कोरियाला बाद फेरी गाठण्यासाठी या लढतीत मोठय़ा फरकाने विजय मिळविण्याची गरज होती. मध्यंतरापूर्वी पंचांनी बेल्जियमच्या स्टिव्हन डेफोरला बाहेर केल्यामुळे कोरियाला वर्चस्व गाजविण्याची संधी होती. कोरिया संघाला मात्र चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले. आशिया खंडातील जपान, ईराण आणि ऑस्ट्रेलिया या संघांप्रमाणो दक्षिण कोरिया संघालाही या स्पर्धेत विजयाची चव चाखता आली नाही.
बेल्जियमचे प्रशिक्षक मार्क विल्मोट्स यांनी रशियाविरुद्ध 1-क् ने विजय मिळविणा:या संघात 7 बदल केले होते. त्यांनी मॅनचेस्टर युनायटेडचा 19 वर्षीय अदनान जानुजाज याला विश्वकप स्पर्धेत पदार्पणाची संधी दिली. दक्षिण कोरिया संघाने या लढतीत आक्रमक सुरुवात करताना सुरुवातीला काही चांगल्या चाली रचल्या, पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही.
किंग यंग ग्वोनला फ्री किकवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविण्यात अपयश आले. सोन ह्युंग मिन यालाही संधीचा लाभ घेता आला नाही. केव्हिन मिरालासने मारोएन फेलाइनीच्या पासवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला खरा, पण पंचांनी त्याला ऑफ साइड ठरविले. (वृत्तसंस्था)