‘भारतीय फुटबॉलच्या नव्या पर्वाची सुरुवात’
By Admin | Updated: June 9, 2014 03:45 IST2014-06-09T03:45:50+5:302014-06-09T03:45:50+5:30
सप्टेंबर २०१४ पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग स्पर्धा भारतीय फुटबॉलमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात असेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल संघ चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.

‘भारतीय फुटबॉलच्या नव्या पर्वाची सुरुवात’
मुंबई : सप्टेंबर २०१४ पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग स्पर्धा भारतीय फुटबॉलमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात असेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल संघ (एआयएफएफ)चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.
नुकत्याच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी पटेल यांनी आपले मत व्यक्त केले. फिफाच्या उद्देशानुसार खेळाला व्यावसायिकतेची जोड देणे महत्त्वाचे आहे. इंडियन सुपर लीगकडे मोठ्या आशेने पाहतो. मला विश्वास आहे की, याद्वारे देशाअंतर्गत खेळात व्यावसायिकता आपल्याला पाहण्यास मिळेल, अशी आशाही पटेल यावेळी व्यक्त केली.
एआयएफएफच्या सूत्रांनुसार, या कार्यक्रमासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलीवूड स्टार जॉन अब्राहम सोबत इंडियन सुपर लीगच्या सर्व टीममालकांची यावेळी उपस्थिती होती. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आगामी २०१७ साली होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाची जोरदार तयारी सुरू असून, ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल, असा दावा एआयएफएफच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. (क्रीडा प्रतिनिधी)