बीसीसीआयचे कसोटी क्रिकेटकडे अजिबात लक्ष नाही

By Admin | Updated: August 19, 2014 00:40 IST2014-08-19T00:40:05+5:302014-08-19T00:40:05+5:30

बीसीसीआयचा दृष्टिकोन फारसा गंभीर नसल्यामुळेच भारताला इंग्लंडकडून 1-3 ने सपाटून मार खावा लागला, अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.

BCCI does not have any attention in Test cricket | बीसीसीआयचे कसोटी क्रिकेटकडे अजिबात लक्ष नाही

बीसीसीआयचे कसोटी क्रिकेटकडे अजिबात लक्ष नाही

मुंबई : कसोटी क्रिकेटकडे पाहण्याचा बीसीसीआयचा दृष्टिकोन फारसा गंभीर नसल्यामुळेच भारताला इंग्लंडकडून 1-3 ने सपाटून मार खावा लागला, अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.
टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्यावर सडकून टीका करीत ‘कर्नल’ वेंगसरकर यांनी संपूर्ण कोचिंग स्टाफ ताबडतोब निलंबित करण्याचीही मागणी केली. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत 116 कसोटी सामने खेळलेले वेंगसरकर यांनी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीबाबत ‘दूरदृष्टी’ नसलेली निवड समिती असा उल्लेख केला. 
लॉर्ड्सवर सलग तीन कसोटी शतके ठोकणारे वेंगसरकर यांनी मुलाखतीत व्यक्त केलेली मते अशी :-
पाच सामन्यांची मालिका गमाविण्यामागील कारण काय?
वेंगसरकर : सर्वात महत्त्वाचे कारण हे, की बीसीसीआय कसोटी क्रिकेटला महत्त्वच देत नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास पाच कसोटी सामने खेळण्याआधी काहीच तयारी केली नव्हती. याशिवाय वेळापत्रकही चुकीचे तयार करण्यात आले. पाचही सामन्यांदरम्यान सराव सामना नव्हताच. यामुळे बाहेर बसलेल्या सात राखीव खेळाडूंना संधी मिळू शकली असती. आम्ही 18 खेळाडू घेऊन दौरा केला आणि तितकाच स्टाफ सोबतीला होता. गोलंदाज 2क् बळी घेण्याइतपत सक्षम नव्हते आणि फलंदाजही फॉर्ममध्ये दिसले नाहीत. वळण घेणारे चेंडू कसे खेळायचे, याचे तंत्र, झुंजार वृत्ती आणि समर्पित भावनेचा अभाव जाणवला. लागोपाठ एकसारखी चूक करताना आमचे फलंदाज ‘बळीच्या बक:या’सारखे दिसले. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग कोच काय करीत होते, याबद्दल आश्चर्य वाटते.
संघ निवड चुकीची होती का?
वेंगसरकर : निवडकत्र्याचे काम सोपे होते, कारण त्यांना सवरेत्कृष्ट 18 खेळाडू निवडायचे होते; पण पर्यायी व्यवस्थेचा विचारच केला नाही. व्हिजनअभावी कठोर निर्णय घेण्याचे साहस केले नाही. 
जडेजा-अँडरसन वाद आणि भारताने अँडरसनच्या निलंबनाविषयी केलेल्या मागणीमुळे खेळाडूंची एकाग्रता भंगली, असे वाटते का?
वेगसरकर : मी असे मानत नाही. अशा घटना कसोटी क्रिकेटचा भाग असतात. अशा गोष्टी खेळाडूंवर हावी होत असतील, तर कसोटी क्रिकेटमध्ये तुमच्यासाठी स्थान नाही. 
पराभवासाठी धोनीचे नेतृत्व आणि फ्लेचर यांचे कोचिंग किती जबाबदार मानता? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड आणि आता पुन्हा इंग्लंड असे सलग पराभवांचे तोंड पाहिल्यामुळे या दोघांची हकालपट्टी व्हावी काय? 
वेगसरकर : धोनीच्या नेतृत्वात चुका आहेत. त्याची संघनिवड नीती, डावपेच, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील बदल यात व्यावहारिकपणाचा अभाव आहे. 
 
 
 
 

 

Web Title: BCCI does not have any attention in Test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.