शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डीआरएससाठी आयसीसीकडून बीसीसीआयची मनधरणी

By admin | Updated: October 16, 2016 21:31 IST

भारताने पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणा-या प्रणालीचा(डीआरएस) वापर करावा यासाठी आयसीसीकडून बीसीसीआयची वारंवार मनधरणी करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

धर्मशाला, दि. 16 - भारताने पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणा-या प्रणालीचा(डीआरएस) वापर करावा यासाठी आयसीसीकडून बीसीसीआयची वारंवार मनधरणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून २० आॅक्टोबर रोजी आयसीसी महाव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासमक्ष अपग्रेड करण्यात आलेल्या डीआरएस प्रणालीचे सादरीकरण देणार आहेत. भारत- इंग्लंड मालिकेतील पाच कसोटी सामन्यादरम्यान डीआरएसचा वापर व्हावा, असे आयसीसीला वाटते.मुख्य कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली हे देखील सादरीकरणाच्यावेळी उपस्थित राहतील. हे दोघेही या काळात वन डे साठी नवी दिल्लीत वास्तव्यास असतील. कुंबळे स्वत: आयसीसी क्रिकेट समितीचे चेअरमन आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या डीआरएसचा स्वीकार करण्यास नकार देणारा भारत हा एकमेव देश आहे. या तंत्राचा पहिल्यांदा वापर २००८ मध्ये झाला होता.बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे दरम्यान पत्रकारांशी चर्चा करताना आम्ही डीआरएसला कधीही नकार दिला नव्हता, असे स्पष्ट केले. डीआरएसमधील उणिवा आधी दूर व्हाव्यात. ही पद्धतपरिपूर्ण असेल तर आम्हाला अमलात आणण्यास हरकत नाही. या पद्धतीत सुधारणा झाल्यास आम्हाला देखील वापर करण्यास हरकत राहणार नसल्याचे लंकेच्या दौ-याच्यावेळी देखील मी स्पष्ट केले होते.’ ठाकूर पुढे म्हणाले,‘ कुंबळे स्वत: आयसीसी क्रिकेट समितीचे बॉस आहेत. त्यांनी डीआरएसवर एमआयटीच्या(मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी)अहवालाचा अभ्यास केला आहे. आयसीसी महाव्यवस्थापक नवी दिल्लीत सादरीकरण देतील त्यावेळी कुंबळे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतरच डीआरएसचे सुधारित रूप मान्य करण्यास आम्ही तयार आहोत की नाही हे मी सांगू शकेन. मी डीआरएसच्या सादरीकरणाद्वारे समाधानी झालो तर आगामी भारत- इंग्लंड मालिकेदरम्यान डीआरएस वापराबद्दल गंभीरपणे विचार केला जाईल.’(वृत्तसंस्था)