शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक व्यवहाराविषयी बीसीसीआय संभ्रमावस्थेत

By admin | Updated: October 6, 2016 04:48 IST

लोढा समितीचा अहवाल लक्षात घेता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन बँकेच्या खात्यांतून कशा प्रकारे आर्थिक व्यवहार करावा, याविषयी क्रिकेट बोर्ड संभ्रमावस्थेत असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : लोढा समितीचा अहवाल लक्षात घेता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन बँकेच्या खात्यांतून कशा प्रकारे आर्थिक व्यवहार करावा, याविषयी क्रिकेट बोर्ड संभ्रमावस्थेत असल्याचे सांगितले.बीसीसीआय सूत्रांनी सांगितले, की या मुद्याच्या स्पष्टतेविषयी बीसीसीआयला उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. सूत्रांनुसार न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरू ठेवण्यासाठी हा मुद्दा स्पष्ट होणे आवश्यक आहे.या अडथळ्यादरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आज राज्य संघटनांना पत्र लिहिले आहे. न्या. लोढा समितीने येस बँक आणि बँक आॅफ महाराष्ट्रात असणाऱ्या खात्यावरील आर्थिक व्यवहाराविषयी बंदी थांबवण्यास सांगितले आहे; परंतु अजूनही बोर्ड कशा प्रकारे आर्थिक व्यवहार करू शकते, याविषयी संभ्रमावस्थेत आहे. ठाकूर म्हणाले, ‘‘प्रसिद्धीमाध्यमातील वृत्तानंतर लोढा समितीने ४ आॅक्टोबर रोजी बँक खात्यावरील आर्थिक व्यवहाराविषयी बंदी हटवण्यात आल्याचे स्पष्ट केले. समितीने फक्त नियमित आार्थिक व्यवहारास मान्यता दिली आहे; परंतु याविषयी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली नाहीत. कोणत्या आर्थिक व्यवहाराला मान्यता दिली जाईल, याविषयी खूप संभ्रम आहे आणि एवढेच नव्हे, तर समितीने राज्य संघटनांना धनराशी देऊ नये, तसेच राज्य संघटनांनी बीसीसीआयच्या निधीचा उपयोग करू नये, असे सांगितले आहे. दुर्दैवाने याचा भारत आणि बीसीसीआयच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे आणि विविध आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांतबँक खात्यावर लावण्यात आलेली रोख आणि ती हटविली जाण्याविषयी वृत्त प्रसिद्ध झाले आहे.’’बीसीसीआयकडे कोणतेही मैदान नाही आणि सामन्यांचे आयोजन राज्य संघटना करतात. राज्य संघटनांकडे पुरेसा आर्थिक निधी नसल्यास सामन्यांच्या आयोजनात समस्या येईल, असे त्यांनी सांगितले.