शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बांगलाची सुपर टेनमध्ये धडक

By admin | Updated: March 14, 2016 01:00 IST

धडाकेबाज सलामीवीर तमीम इक्बाल याने झळकावलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर बांगलादेशने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर टेन गटात प्रवेश करताना नवख्या ओमानला ५४ धावांनी नमवले

धरमशाला : धडाकेबाज सलामीवीर तमीम इक्बाल याने झळकावलेल्या तडाखेबंद नाबाद शतकाच्या जोरावर बांगलादेशने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर टेन गटात प्रवेश करताना नवख्या ओमानला ५४ धावांनी नमवले. विशेष म्हणजे, टी-२० मध्ये बांगलादेशकडून पहिला शतक झळकावलेल्या इक्बालची खेळी यंदाच्या विश्वचषकमधील पहिले शतक ठरले.धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून ओमानने बांगलादेशला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. मात्र, इक्बालने त्यांचा हा निर्णय उलटवताना ६३ चेंडंूत नाबाद १०३ धावा फटकावत बांगलादेशला निर्धारित षटकांत २ बाद १८० धावांची आव्हानात्मक मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात झालेल्या ओमानचा डाव ९ बाद ६५ धावांत रोखला गेला. ओमान फलंदाजी करत असताना दोनवेळा आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांना १२ षटकांत १२० धावांचे कठीण आव्हान मिळाले होते.मधल्या फळीतील जतिंदर सिंग (२५) व अदनान इल्यास (१३) या दोघांचा अपवाद वगळता ओमानच्या एकाही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशने यावेळी टिच्चून मारा करताना ओमानला सहजपणे लोळवले. अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याने ३ षटकांत १५ धावा देताना ४ बळी घेत ओमानचे कंबरडे मोडले.याआधी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने इक्बालच्या धुवाधार फटकेबाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या गाठली. इक्बालने ६३ चेंडंूत १० चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद १०३ धावांचा तडाखा दिला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :बांगलादेश : २० षटकांत २ बाद १८० धावा (तमीम इक्बाल नाबाद १०३, शब्बीर रहमान ४४; खवार अली १/२४, अजय लालचेता १/३५) वि.वि. (डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे) ओमान : १२ षटकांत ९ बाद ६५ धावा (जतिंदर सिंग २५, अदनान इल्यास १३; शाकिब अल हसन ४/१५)