बांगलादेशचे ऑस्ट्रेलियाला १५७ धावांचे आव्हान
By Admin | Updated: March 21, 2016 21:41 IST2016-03-21T21:17:18+5:302016-03-21T21:41:41+5:30
टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला १५७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात बांगलादेशने २० षटकात पाच बाद १५६ धावा केल्या.

बांगलादेशचे ऑस्ट्रेलियाला १५७ धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २१ : टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला १५७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात बांगलादेशने २० षटकात पाच बाद १५६ धावा केल्या. बांगलादेशचा फलंदाज महमुदुल्लाने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने २९ चेंडूत एक षटकार आणि सात चौकार लगावत नाबाद ४९ धावा केल्या. तर मोहम्मद मिथुनने २२ चेंडूत २३ धावा केल्या. सौम्या सरकार अवघ्या शून धावेवर बाद झाला. त्याला गोलंदाज वॅटसनने झेलबाद केले. सब्बीर रेहमान १२ धावांवर बाद झाला, तर शकीब हसन ३३ आणि मुशफिकर रहिमने नाबाद १५ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज वॅटसनने ४ षटकात ३१ धावा देत दोन बऴी टिपले, तर अॅडम झांपाने तीन बळी घेतले.