बांगलादेशकडून झिम्बाब्वेचा ५-० ने धुव्वा
By Admin | Updated: December 2, 2014 01:36 IST2014-12-02T01:36:08+5:302014-12-02T01:36:08+5:30
बांगलादेशने विजयी लक्ष्य २४़३ षटकांत पूर्ण केले़ त्यांच्याकडून महमुदुल्लाह याने ५५ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ५१ धावांची खेळी केली़ शब्बीर रहमान याने नाबाद १३ धावांचे योगदान

बांगलादेशकडून झिम्बाब्वेचा ५-० ने धुव्वा
ढाका : ताईजूल इस्लामने आपल्या पदार्पणीय सामन्यात घेतलेल्या ऐतिहासिक हॅट्ट्रिकच्या बळावर बांगलादेशने पाचव्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यांत झिम्बाब्वेला ५ विकेटस्नी धूळ चारली़ या विजयासह बांगलादेशने ५ सामन्यांच्या मालिकेत ५-० असे वर्चस्व राखले़
बांगलादेशने झिम्बाब्वेला ३० षटकांत १२८ धावांत गुंडाळल्यानंतर विजयी लक्ष्य अवघ्या २४़३ षटकांत ५ गड्यांच्या बदल्यात पूर्ण करीत सामन्यात बाजी मारली़ बांगलादेशचा ताईजूल इस्लाम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला तर मुशफिकर रहिम मालिकावीर ठरला़
झिम्बाब्वेकडून सलामीवीर फलंदाज हॅमिल्टन मस्कज्दा याने ५४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली़ तर वुसी सिबांदा याने ३७ धावांचे योगदान दिले़ ताईजूलने ७ षटकांत केवळ ११ धावा देत ४
गडी बाद केले़ शाकीब अल हसन
याने ३ तर जुबेर हुसैन याने २ बळी मिळविले़
बांगलादेशने विजयी लक्ष्य २४़३ षटकांत पूर्ण केले़ त्यांच्याकडून महमुदुल्लाह याने ५५ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ५१ धावांची
खेळी केली़ शब्बीर रहमान याने नाबाद १३ धावांचे योगदान दिले़ या लढती झिम्बाब्वेने १७ अतिरिक्त धावाही बहाल केल्या़ झिम्बाब्वेकडून चाताराने ४४ धावांत ३ तर पेनयंगाराने ४९ धावांत २ बळी मिळविले़ (वृत्तसंस्था)