शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; पैलवानांचा निर्धार, ब्रीजभूषण सिंह यांची मवाळ भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 19:27 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

brijbhushan singh news । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात होत असलेल्या आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील दिग्गज पाठिंबा देत आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झासह क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या मागणीला यश आले असून भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी SC ला सांगितले की WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बजरंग पुनियाने पत्रकार परिषदेत म्हटले, "लवकरात लवकर कठोर कारवाई करून आरोपीला तुरुंगात टाका. दिल्ली पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाकडून एफआयआर नोंदवण्याचे आदेश मिळाले आहेत. एखाद्या महासंघाचा प्रमुखच असा छळ करतो, तेव्हा खेळाडू त्याची तक्रार कोणाकडे करणार. महासंघात प्रमुखापेक्षा कोणीही मोठे नाही." केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे खेळाडूंचे फोन उचलत नसल्याचा खुलासाही बजरंगने केला. तर विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदांवरून काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.  

ब्रीजभूषण सिंह यांनी मांडली भूमिकाहे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. न्यायालयाने आज जो काही निर्णय दिला त्याचे मी स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आणि पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. तपासात माझ्या सहकार्याची आवश्यकता असेल तेथे मी सहकार्य करेन, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. 

दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला एफआयआरबद्दल माहिती दिली. खरं तर सर्वोच्च न्यायालय ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. २६ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले होते की, आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यापूर्वी आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे.

आखाड्याबाहेरील कुस्तीचा सहावा दिवसऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत.  प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी (ब्रिजभूषण शरण सिंह) अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीNew Delhiनवी दिल्लीVinesh Phogatविनेश फोगटBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय