शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन वेळापत्रक व्यस्त; पण पर्याय नाही : गोपीचंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:35 IST

भारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे.   भारतीय खेळाडू गरजेपेक्षा अधिक स्पर्धा खेळत असल्याचे विधान दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात बॅडमिंटनपटूंच्या व्यस्त वेळापत्रकाचीच चर्चा सुरू झाली. एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद म्हणाले,‘व्यस्त वेळापत्रकाचा फटका केवळ भारतीय खेळाडूंनाच नव्हे तर जगातील खेळाडूंना बसतो आहे. महत्त्वपूर्ण असलेल्या आशियाई आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांमध्ये खेळणे गरजेचे असल्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी पाठोपाठ स्पर्धा खेळणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.’युरोपातील खेळाडू राष्ट्रकुल किंवा आशियाई खेळात खेळत नाहीत पण आमच्या खेळाडूंपुढे पर्याय नाही. आमच्या खेळाडूंना परिस्थितीशी ताळमेळ साधावाच लागेल. प्रवास करताना देखील सरावाकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ भारताच्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देत राष्ट्रकुलमध्ये दुय्यम दर्जाचा संघ पाठविणे योग्य राहील का, असा सवाल करताच गोपीचंद म्हणाले, ‘नाही. राष्ट्रकुल ही महत्त्वाची स्पर्धा असल्याने आम्हाला दुय्यम दर्जाचे खेळाडू पाठविता येणार नाही. पुढील सत्रात आमच्याकडे ठोस योजना असेल. आम्ही अधिकारी आणि खेळाडूंसोबत चर्चा करीत योजना आखणार आहोत. यामुळे काही खेळाडूंना विश्रांतीची संधी मिळू शकेल.’ यंदा दोन मोठ्या स्पर्धांमध्ये सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याबद्दल विचारताच गोपीचंद यांनी आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही, इतकेच सांगितले. (वृत्तसंस्था)सिंधू युवा आहे आणि तिने अनेक शानदार विजय नोंदविले आहेत. भविष्यातही ती आणखीदेखील कामगिरी बजावेल. मी तिच्या कामगिरीवर आनंदी आहे. ती सध्या केवळ २२ वर्षांची आहे. मी तिच्याकडून मोठ्या कामगिरीबद्दल आश्वस्त आहे. - गोपीचंद

टॅग्स :BadmintonBadminton