बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालनं भारताच्या आशा केल्या पल्लवीत
By Admin | Updated: August 11, 2016 22:21 IST2016-08-11T22:21:11+5:302016-08-11T22:21:11+5:30
बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूपाठोपाठ सायना नेहवालनेही पहिल्या फेरीतील सामन्यात विजय मिळवला आहे.

बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालनं भारताच्या आशा केल्या पल्लवीत
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 11 - बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूपाठोपाठ सायना नेहवालनेही पहिल्या फेरीतील सामन्यात विजय मिळवला आहे. यजमान देशाच्या लॉहिनी विसेंटला सायनाने सरळ सेटमध्ये पराभवाची धूळ चारली आहे.
सायना नेहवालच्या कामगिरीकडे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची मान उंचावली आहे. लढतीत सायनानं 39 मिनिटांमध्ये विजय मिळवला आहे. पहिला सेट 20 मिनिटे, तर दुसरा सेट 19 मिनिटे सुरू असतानाच तिने 21-17, 21-17 असा विजय मिळविला.
सिंधूच्या तुलनेत सायनाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले आहेत. संपूर्ण सामन्यात सायनाला जास्तीत जास्त सहाच गुणांची आघाडी मिळविता आली आहे. तरीही तिने राखलेले वर्चस्व सायनाच्या पुढील कामगिरीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.