शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

"सायना म्हणजे खेळामधील कंगना", चाहत्यांचा रोष; आता बॅडमिंटनपटूने एका दगडात दोन पक्षी मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 20:10 IST

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Badminton Player Saina Nehwal : सायना नेहवाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिने भारतातील क्रीडा संस्कृती आणि भारतीयांचे क्रिकेटवर असलेले प्रेम. याबद्दल भाष्य करून अनेक प्रश्न उपस्थित केले. याशिवाय सायनाने भारतीयांना फटकारताना इतरही खेळांना प्राधान्य द्यायला हवे असे सांगितले. अलीकडेच तिने भालाफेकबद्दल एक विधान केले होते. नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकेपर्यंत मला या खेळाबद्दल अजिबात माहिती नव्हती असे तिने म्हटले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने गोल्डन कामगिरी केल्यानंतर अनेकांना या खेळाबद्दल समजले असे तिने सांगितले होते. सायना नेहवालच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली.

सायनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. 'सायना नेहवाल म्हणजे क्रीडा क्षेत्रातील कंगना रनौत' अशा शब्दांत चाहत्यांनी टीका केली. मग एका वृत्तपत्राच्या पोस्टवर व्यक्त होताना सायनाने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली की, प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद. कंगना चांगलीच आहे. पण मला माझ्या खेळात परिपूर्ण व्हायचे होते. मी अभिमानाने माझ्या देशासाठी बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थान गाठले आणि ऑलिम्पिक पदक जिंकले. मी पुन्हा सांगेन की, घरी बसून बोलणे खूप सोपे आहे. नीरज चोप्रा आमचा सुपरस्टार आहे, त्याने या खेळाला प्रसिद्धी मिळवून दिली. 

सायना काय म्हणाली होती?अलीकडेच एका मुलाखतीत सायनाने सांगितले की, जेव्हा नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले तेव्हा मला भालाफेकबद्दल समजले. जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्ही पाहाल ना? जर तुम्ही पाहिलेच नाही तर कसे काय समजेल? मला भालाफेक प्रकाराबद्दल काहीच माहिती नव्हते. कारण की बरेच खेळ आहेत. मला खात्री आहे की लोकांना बॅडमिंटनबद्दल देखील माहिती नसेल. प्रकाश सर कोण हे मला माहीत नव्हते. ते कोण आहेत हे मला जाणून घ्यायचे नाही असे काही नव्हते. परंतु तुम्ही तुमच्या खेळात इतके व्यग्र असता की तुम्ही इतर कशासाठीही वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल सतत गुगल करावे लागते.  

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालNeeraj Chopraनीरज चोप्राTrollट्रोलKangana Ranautकंगना राणौत