बॅड बाईट, बिग बॅन!
By Admin | Updated: June 26, 2014 02:26 IST2014-06-26T02:26:34+5:302014-06-26T02:26:34+5:30
इटलीविरुद्धच्या लढतीत डिफेंडर जॉजिर्यो चिलीनी याच्या खांद्याला चावा घेणो उरुग्वेचा स्टार स्ट्राईकर सुआरेज लुईसला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आह़े

बॅड बाईट, बिग बॅन!
>सुआरेझ पुन्हा अडचणीत : जॉजिर्योच्या खांद्याला चावा
रिओ दि जेनेरिओ : फिफा फुटबॉल विश्वचषकातील इटलीविरुद्धच्या लढतीत डिफेंडर जॉजिर्यो चिलीनी याच्या खांद्याला चावा घेणो उरुग्वेचा स्टार स्ट्राईकर सुआरेज लुईसला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आह़े या कृत्यामुळे सुआरेजवर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) 24 सामन्यांची बंदी किंवा 2 वर्ष देशाकडून सामने खेळण्यास मज्जव केला जाऊ शकतो़
मंगळवारी इटली विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांत उरुग्वेने 1-क् असा विजय मिळवुन थाटात स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला होता़ उरु ग्वेकडून कर्णधार आणि बचाव फळीतील भक्कम खेळाडू दिएगो गोडीन याने 81 व्या
मिनिटाला नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. दिएगोच्या गोल नोंदविण्याच्या 9 मिनिटे आधी इटलीचा डिफेंडर चीलीनी याच्या खांद्याला चावा घेतला़ यावेळी टिव्हीवर पुन्हा पुन्हा चावा घेतल्याचे दृश्य दाखविण्यात येत होत़े विशेष म्हणजे इटलीच्या संघाने या प्रकरणी जोरदार आवाज उठविला मात्र तरीही रेफरीने सुआरेजवर कारवाई केली नाही़ खेळ भावना दुखविण्याची सुआरेजची हि पहिलीच वेळ नाही़ गत वर्षी सुआरेजवर लीग मध्ये चेल्सीचा खेळाडू ब्रेनस्लाव इवानोविचला चावा घेतल्यामुळे 1क् सामन्यांची बंदी घातली होती़ तर 2क्1क् मध्ये डच क्लब एजेक्स अॅम्सटर्डम कडून खेळताना खेळाडूला चावा घेतला होता़ त्यावेळी सुद्धा त्याच्यावर 7 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती़ (वृत्तसंस्था)
या प्रकरणी इटलीने आपले म्हणणो फिफाकडे दिले आहे. उरूग्वेला त्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी देण्यासाठी फिफाने त्यांना ब्राझील वेळेनुसार सायं. 5 र्पयत (भारतीय वेळेनुसार रात्री 1.3क् वा.)ची वेळ दिली आहे. त्यानंतर फिफाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
सुआरेझचा तिसरा चावा
उतारार्धात 79 व्या मिनिटाला नाउमेद झालेला सुआरेझ भलतेच काहीतरी करून बसला. सुआरेझ ने सेलीनीचा खांद्या चावला. सेलीनी ने पंच मार्को रॉड्रिकगेझ यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही.
सुआरेझच्या चाव्याचा निषेध
माजी खेळाडू पासून फुटबॉल पंडिता र्पयत, तसेच सोशल मिडीयावर ट्विटर पासून फेसबुक र्पयत सा:यांनी सुआरेझच्या चाव्या बद्दल निषेध व्यक्त केला आहे.
जुलै 2क्1क्च्या
विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत लुई सुआरेझने चेंडू हाताने अडवला अन् घानाला नामी पेनल्टी मिळाली. हाताने चेंडू अडवणा:या लुई सुआरेझला पंचांनी रेड कार्ड दाखवले.
नोव्हेंबर 2क्11मध्ये एअॅक्सकडून खेळताना पी.स.व्ही. आईंडओव्हनचा खेळाडू ओटमन बक्कल याचा
खांदा चावल्याप्रकरणी त्याच्यावर
7 सामन्याची बंदी लादण्यात
आली होती.
2क्11-2क्12च्या मोसमात डिसेंबर 2क्11मध्ये मँचेस्टर युनायटेडच्या पॅट्रिक एवराविरुद्ध वर्णद्वेषी भाष्य केल्यामुळे त्याला 8 सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते.
एप्रिल 2क्13मध्ये अॅनफिल्ड येथे लिव्हरपूलकडून खेळताना चेल्सीच्या ब्रॅनिस्लाव इवानोविचला चावल्याप्रकरणी त्याच्यावर 1क् सामन्यांची बंदी लादण्यात आली होती. हा सामान 2-2 गोलबरोबरीत संपला.
गुडघ्यावर झालेल्या दुखापतीमुळे गेले काही महिने वादग्रस्त लुई सुआरेझ मैदानाबाहेरच होता. गेल्याच महिन्यात त्याने पुनरागमन केले. विश्चचषक फुटबॉल अभियानाची पराभवाने सुरुवात झालेल्या उरुग्वेला इंग्लंडविरूद्ध त्याच्या डबल धमाक्यामुळे जीवनदान लाभले होते. त्याने इंग्लंडविरुद्ध केलेल्या दोन गोलमुळे तो खूप खुषीत होता.
1954 हंगेरी, ब्राझीलमधील विश्वकपचा अंतिम सामना : स्वित्ङरलडमध्ये या दोन्ही संघादरम्यान क्वार्टर फायनलमध्ये हंगेरीने विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात अभद्र खेळाचे प्रदर्शन करत हा सामना 4-2ने आपल्या नावे केला होता. या लढतीत त्यांच्या तीन खेळाडूंना लाल कार्ड दाखवण्यात आले होत़े प्रेक्षकांनी, ब्राझीलचे अधिकारी आणि प्रसार माध्यमांनी अनेक वेळी सामन्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता़
1982 शुमाकरकडून खुंबा मारणो : जर्मनीचा गोलकीपर हेराल्ड टोनी शुमाकरने 1982च्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूला जाणूनबुजून खुंबा मारला होता़ या उपांत्य सामन्यात फ्रान्सचा पॅट्रिक बॅटिस्टन गोल नोंदवण्याचा प्रयत्न करत असताना शुमाकरने त्याला खुंबा मारला होता़
1986 : अर्जेटिनाचा स्टार डिएगो मॅराडोनाने इंग्लंडविरुद्ध क्वार्टर फायनलच्या सामन्यात सामन्यात नोंदवलेला हॅण्ड ऑफ गॉड हा गोल आजर्पयत वादग्रस्तच आहेत. त्याने दोन उत्कृष्ट गोल नोंदवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता़
199क् चा अंतिम सामना : नेदरलँडचा डिफेंडर फ्रँक रिजकार्ड आणि जर्मनीचा स्ट्रायकर रुडी वोलेर यांच्यात वाद झाला होता़ रिजकार्डने फाऊल केल्यामुळे त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले होत़े यानंतर तो वोलेरच्या अंगावर थुंकला होता़
2क्क्6 जिनेदिन जिदानचा हेडबट : फ्रान्सचा आदर्श खेळाडू जिनेदिन जिदान 2क्क्6च्या विश्वकप स्पर्धेत चुकांच्या कारणामुळे चर्चेत आला होता़ आपल्या कारकिर्दीतील दुस:या विश्वकप स्पर्धेत तो खेळत होता़ फ्रान्सने 1998च्या विश्वकप स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावे केले होते, त्या संघात तो सदस्य होता़