बाबूल सुप्रियो बनले आयोजन समिती उपाध्यक्ष

By Admin | Updated: March 16, 2017 01:15 IST2017-03-16T01:15:43+5:302017-03-16T01:15:43+5:30

केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना फिफा अंडर १७ वर्ल्डकप आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Babul Supriyo, Organizing Committee Vice President | बाबूल सुप्रियो बनले आयोजन समिती उपाध्यक्ष

बाबूल सुप्रियो बनले आयोजन समिती उपाध्यक्ष

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना फिफा अंडर १७ वर्ल्डकप आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी टिष्ट्वट केले, ‘आपले मित्र अणि फुटबॉल चाहते यांना अंडर १७ वर्ल्डकप आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आमच्यासोबत येणाऱ्या बाबूल सुप्रियो यांचे स्वागत.’ सुप्रियो यांनी टिष्ट्वट केले, ‘मला अंडर १७ फिफा वर्ल्डकप आयोजन समितीचा उपाध्यक्ष नियुक्त केल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे आभार. फुटबॉल आणि आपल्या भूमिकेविषयी मी रोमांचित आहे.’ या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन प्रथमच भारतात ६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान केले जाणार
आहे. स्पर्धेचा ड्रॉ ७ जुलैला होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Babul Supriyo, Organizing Committee Vice President