Commonwealth Games 2018 : कुस्तीपटू बबिता फोगाटला सुवर्णपदकाची हुलकावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:04 IST2018-04-12T13:04:55+5:302018-04-12T13:04:55+5:30
भारताची महिला गटातीला आघाडीची कुस्तीपटू बबिता फोगाटचे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले आहे. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Commonwealth Games 2018 : कुस्तीपटू बबिता फोगाटला सुवर्णपदकाची हुलकावणी
गोल्ड कोस्ट - भारताची महिला गटातीला आघाडीची कुस्तीपटू बबिता फोगाटचे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले आहे. महिलांच्या 53 किलो वजनी गटात बबिताने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारली होती. मात्र अंतिम लढतीत बबिताला कॅनडाच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे बबिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
या लढतीत बबिताने कॅनडाच्या डायना वेईकेरला कडवी झुंज दिली. सुरुवातीला चुरशीच्या झालेल्या या लढतीत बबिताने एकवेळ 2-1 अशी आघाडी मिळवली होती. मात्र डायनाने पलटवार करताना सलग तीन गुण घेत बबिताला पराभवाचा धक्का दिला.
Indian wrestler #BabitaKumari settles for silver medal 🥈 in women's freestyle 53kg category#GC2018#GC2018Wrestlingpic.twitter.com/evtIQBExmH
— Doordarshan News (@DDNewsLive) April 12, 2018